Nashik : निमाणी बसस्थानकात ‘खड्डेच खड्डे’

Potholes Nashik Marathi News
Potholes Nashik Marathi Newsesakal
Updated on

नाशिक : शहर बससेवेचे मुख्य आगार असलेल्या निमाणी बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून बस आत नेताना व बाहेर काढताना चालकांना अक्षरश: कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. (Potholes at Nimani Bus Station Nashik Latest Marathi News)

राज्य परिवहन महामंडळातर्फे शहर बसचे सारथ्य असल्यापासून निमाणी बसस्थानका मागील शुक्लकाष्ट दूर झालेले नाही. शहरात एकीकडे स्मार्टसिटीतंर्गत सिमेंट काँक्रिटचे थरा वर थर चढत असताना निमाणी बसस्थानकात गेल्या कित्येक वर्षापासून असलेले मोठे खड्डे यंत्रणेला दिसत नाहीत का, असा प्रश्‍न प्रवाशांनी विचारला आहे.

स्थानकाला ‘स्मार्ट’चे वावडे

शहराच्या सर्वच भागात स्मार्टसिटीतंर्गत मोठ्या प्रमाणावर रस्ते व भूमिगत गटारींची कामे सुरू आहेत. गंगाघाटावर चक्क नदीपात्रालगत फरशा बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुसरीकडे शहरातील सिटीलिंक बससेवेचे मुख्य केंद्र असलेल्या निमाणीला कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे. शहरातील इतर भागात चांगले रस्ते फोडून नव्याने रस्ते केले जात असताना या स्थानकाला विकासाचे वावडे असल्याचे दिसते.

Potholes Nashik Marathi News
प्रमोद महाजन उद्यानाची भिंत कोसळली

या ठिकाणी लावण्यात आलेले छत निखळून खाली आहे आहे. मात्र यंत्रणेने केवळ त्याला दोरी गुंडाळून एकत्र ठेवणे पसंत केले आहे. चिखल व घाणीमुळे सिटीलिंकच्या वाहक चालकांसह प्रवाशांनाही येथील स्वच्छतागृहापर्यंत पोचणे अवघड बनले आहे.

वाहतूक कोंडी नित्याचीच

निमाणी बसस्थानकात बस नेणे एकवेळ सोपे, परंतु सकाळ, सायंकाळी या स्थानकातून बस बाहेर काढणे प्रचंड कसरतीचे झाले आहे. पंचवटीतून आडगाव नाक्याकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या ठिकाणी सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. वाहतूक शाखेचा कर्मचारी हजर नसेल तर या कोंडीत भरच पडते.

Potholes Nashik Marathi News
Nashik : अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा संशयित जेरबंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com