2 दिवसाच्या पावसात 14 वृक्ष कोसळले | Nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाने उच्च दाबाच्या तारांवर कोसळलेले झाड

2 दिवसाच्या पावसात 14 वृक्ष कोसळले

जुने नाशिक : पावसामुळे शहराच्या विविध भागात सुमारे १४ वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला, तर सिडको परिसरात वाहनाचे नुकसान झाले आहे. गुरुवारी (ता. ९) सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा: सलग दुसर्या दिवशी पावसाचा लपंडाव सुरुच

सातपूरमध्ये तीन ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. तर, वडाळा नाका परिसरात उच्च दाबाच्या तारेवर वृक्ष कोसळल्याने जुने नाशिकसह वडाळा रोड, नागजी हॉस्पिटल परिसर, द्वारका तसेच विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला. बहुतांशी भागात रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. शुक्रवारी (ता. १०) दुसऱ्या दिवशीदेखील सायंकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे दहा ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या.

सिडको येथे चार ठिकाणी, सातपूर भागात तीन ते चार ठिकाणी, तर कॅनडा कॉर्नर आणि मुंबई नाका परिसरात झाडाच्या फांद्या तसेच वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. सिडको येथील महाराष्ट्र बँक परिसरातील झाडाखाली उभ्या असलेल्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा मात्र सलग दुसऱ्या दिवशीही खंडित झाला आहे. अग्निशमन विभागास माहिती मिळताच त्यांनी कोसळले वृक्ष हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिला. महापालिकेकडून धोकादायक आणि पोकळ झालेले वृक्षांचे सर्वेक्षण करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने दरवर्षी वृक्ष कोसळण्याच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडत आहे.

हेही वाचा: स्‍वच्‍छतेतील हलगर्जीपणामुळे ठेकेदाराला बजावली नोटीस

Web Title: Power Supply Cut Off Due To Tree Collapses On High Pressure Electric Wire In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top