Nashik News : भाविकांच्या चरणसेवेची अव्याहत 37 वर्ष झळकेगिरी! व्यंगचित्रकार झळकेंनी जपली अनोखी परंपरा

Prabhakar Jhalke and colleagues taking care of  footwear for devotees during the yatra.
Prabhakar Jhalke and colleagues taking care of footwear for devotees during the yatra.esakal

Nashik News : दर्शन घेताना ‘देव देवळात आणि चित्त खेटरात’ ही मनोवृत्ती सगळ्यांचीच असते. मात्र, कोटमगावच्या यात्रेत हा वैताग अजिबात जाणवत नाही. कारण शहराची सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य करणाऱ्या व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी अनोखी झळकेगिरी येथे सुरू केली आहे, ती म्हणजे भाविकांच्या चरणसेवेची.

यात्रेत सामाजिकत्व गेल्या ३७ वर्षांपासून धडपड मंचच्या माध्यमातून ते निभावत आहेत. चरणसेवा करून सहकाऱ्यांसह स्वतः उभे राहून भाविकांची पादत्राणे निःशुल्क सांभाळण्याच्या त्यांच्या या परंपरेला सलामच करावा वाटतो. (Prabhakar Zalke and colleagues take care of footwear for free during yatra nashik news)

यात्रेच्या ठिकाणी पादत्राणे कुठे ठेवावीत, हा भाविकांना पडणारा गहन प्रश्‍न. म्हणूनच १९८४ मध्ये मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांनी स्टॉल मांडून हा झळ सहन करणारा उपक्रम सुरू केला आहे. येथील यात्रेला मोठा इतिहास असून, वर्षानुवर्ष येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

भाविकांची पादत्राणे मोफत सांभाळण्याचे काम येवल्यातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या धडपड मंचने १९८४ पासून सुरू केले. कोरोना व काही अपरिहार्य कारणास्तव तीन वर्ष खंड वगळता गेल्या ३७ वर्षांपासून अव्याहतपणे हा उपक्रम सुरू आहे.

नवरात्रोत्सवात कोटमगावला गेल्यावर मंदिराजवळच ‘मोफत चरणसेवा’ नावाचा स्टॉल दिसेल. तेथे प्रभाकर झळके व त्यांचे सहकारी हसतमुखाने भाविकांची पादत्राणे आपल्या हाती घेऊन ती नंबरवर ठेवून त्या नंबरचे टोकन देतात.

Prabhakar Jhalke and colleagues taking care of  footwear for devotees during the yatra.
Chirai Mata Mandir : चिराईमाता मंदिर परिसराला मिळावा पर्यटनस्थळाचा दर्जा; वनखात्याच्या हद्दीमुळे अडसर

दर्शन घेऊन आल्यानंतर ते टोकन दाखविल्यानंतर त्या क्रमांकावरचे पादत्राणे दिली जातात. दहा दिवस रोज सकाळी दहापासून ते रात्री साडेनऊपर्यंत विनामूल्य ही सेवा सुरू आहे. या कार्यात झळके यांना मुकेश लचके, मयूर पारवे, दत्ता कोटमे, गोपाळ गुरगुडे, श्रावणर शेलार, मंगेश रहाणे, वरद लचके आदी सहकार्य करतात. सामाजिक बांधिलकी जपत अनेक तरुण उत्स्फूर्तपणे योगदान देतात.

"धार्मिक कार्यात सहभागी होऊन सेवा करण्याचा आनंद वेगळा आहे. चरणसेवा हीच ईश्वरसेवा मानून आम्ही हे कार्य करीत आहोत. पादत्राणे सांभाळण्याचे काम कमीपणाचे आम्ही मुळीच मानत नाहीत. भाविक त्यांची सेवा करण्याची आम्हास संधी देतात. यातच आम्हाला फार मोठे आत्मिक समाधान व आनंद मिळतो." -प्रभाकर झळके, व्यंगचित्रकार, येवला

Prabhakar Jhalke and colleagues taking care of  footwear for devotees during the yatra.
Nashik Renuka Mata : महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजराजेश्वरी रेणुकामाता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com