Gas Geyser Precaution: गॅस गिझर वापरताय.. हलगर्जी बेतेल जिवावर! आवश्‍यक खबरदारी घेण्याचा तज्‍ज्ञांचा सल्‍ला

precautions of using gas geyser nashik news
precautions of using gas geyser nashik newsesakal

Gas Geyser Precaution: सध्या वातावरणात गारवा जाणवू लागला असून, अनेकांकडून अंघोळीदरम्‍यान गरम पाण्याचा वापर केला जाऊ लागलाय. पाणी गरम करण्यासाठी अनेकांकडून गॅस गिझरचा वापर केला जातो.

परंतु वापरादरमयान आवश्‍यक खबरदारी घेतली नाही, तर हलगर्जी थेट जिवावर बेतू शकतो. त्‍यामुळे खबरदारी घेण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे.

इतर पर्यायांपेक्षा स्‍वस्‍त असल्‍याने अनेक जण गॅस गिझर वापरण्याला प्राधान्‍य देतात. सुस्‍थितीतील गिझरमुळे तसा फारसा धोका नसतो. परंतु बऱ्याच वेळा गळती व इतर विविध कारणांमुळे अत्‍यंत घातक स्‍थिती उद्‍भवू शकते. (precautions of using gas geyser nashik news)

अशावेळी बेसावध राहिल्‍यास सौम्‍य ते गंभीर स्वरूपाचे परिणाम भोगावे लागण्याची शक्‍यता असते. अशात आता हिवाळ्याचा हंगाम सुरू होत असताना, गॅस गिझरचा वापर करणाऱ्या नागरिकांनी आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्‍ला डॉक्‍टरांकडून दिला जातो आहे.

थेट जिवावर बेतू शकते

गिझरमध्ये एलपीजीचा वापर होत असल्‍याने त्‍यातून उत्‍सर्जित होणारे कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्‍साईड, नायट्रोजन डायऑक्‍साईड यांसारखे घटक थेट जिवावर बेतू शकतात. चक्‍कर येणे, मळमळ, उलटी, थकवा येणे, पोटदुखी यांसारख्या सौम्‍य तक्रारींपासून तर श्‍वास घेण्यास त्रास होणे, बेशुद्ध पडणे, अर्धांगवायूचा झटका येणे, मेंदूवर गंभीर परिणाम होऊन कोमात जाण्यासारखी गंभीर परिस्थिती उद्‌भवू शकते.

गॅस गिझर वापरताना ही काळजी घ्या...

- बंदिस्‍त बाथरूममध्ये शक्‍यतो गिझर ठेवू नका

- हवेशीर जागेत गिझर असायला हवे

- हवा बाहेर फेकणारे यंत्र (एक्‍झॉस्‍ट फॅन) असलेले योग्‍य

- गिझरची वेळोवेळी देखभाल दुरुस्‍ती करावी

precautions of using gas geyser nashik news
Geyser Precaution Tips : हिवाळ्यात गिझरची सर्व्हिसिंग गरजेची, अन्यथा होऊ शकते मोठी दुर्घटना

- अंघोळ करण्यापूर्वी पाणी गरम करून घ्यावे

- अंघोळ करताना गिझर बंद असल्‍याची खात्री करावी

- गॅसचा वास आल्‍यास तत्काळ हवेशीर ठिकाणी जावे

- श्‍वसनाचा त्रास असलेल्‍यांनी गॅस गिझरचा वापर टाळावा

- लहान मुले, गरोदर महिलांनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे

- आरोग्‍यविषयक तक्रार जाणवल्‍यास तातडीने उपचार घ्यावे

"गॅस गिझर वापरातील धोक्‍यांबाबत शास्‍त्रोक्‍त अभ्यास समोर आलेला असून, हे गिझर न वापरण्याचा सल्‍ला वैद्यकीय तज्‍ज्ञ गेल्‍या अनेक वर्षांपासून देत आहेत. तरीदेखील काही लोक वापरत असतील तर त्‍यांनी सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे. गॅसची टाकी हवेशीर जागेत ठेवावी. गिझरच्‍या संपर्कात असताना अस्‍वस्‍थ वाटल्‍यास तातडीने डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्यावा." - डॉ. समीर चंद्रात्रे, माजी अध्यक्ष, आयएमए नाशिक

precautions of using gas geyser nashik news
Bathing Tips: आंघोळ करताना तम्हीही या चुका करता का? अन्यथा त्वचेचं होऊ शकतं मोठं नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com