९८ टक्के पावसाच्या अंदाजामुळे यंदा खरीप हंगामाची जय्यत तयारी!

अनुदानित बियाणांचे वाटप करण्यात येणार
farmer
farmeresakal

घोटी (जि.नाशिक) : हवामान खात्याने (weather department) चालू वर्षी ९८ टक्के निश्चित पर्जन्यमानाचा (rainfall forecast) अंदाज वर्तविल्याने यंदा खरीप हंगामाची तालुका कृषी कार्यालयाने जय्यत तयारी सुरु केली आहे. लॉकडाउनच्या (lockdown) आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढताना भरघोस निश्चित उत्पादन मिळवून देण्यासाठी शेतकरी (farmer) प्रबोधन मेळावे, अनुदानित बियाणे वाटप, जैविक खते, यंत्र, बियाणे यांचा तुटवडा अथवा साठेबाजी ऐन हंगामात होवू देणार नसल्याचेही तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी सांगितले. (preparation due rainfall forecast nashik marathi news)

farmer
ग्राउंड रिपोर्ट : नाशिक-जळगाव सीमेवर ‘आओ जाओ घर तुम्हारा’!

९८ टक्के पर्जन्यमान अंदाजामुळे यंदा खरीप हंगामाची जय्यत तयारी सुधारित भात लागवड करण्याकडे आदिवासी भागातील शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. मंडळनिहाय कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून शेतकरी शासनाच्या संपर्कात असतात. यामुळे सालाबादप्रमाणे येणाऱ्या योजनेचा फायदा अधिकाधिक शेतकऱ्यांना कसा होईल, याकडे तालुका कृषी कार्यालयाचे लक्ष असते. शेतकऱ्यांनी मान्यताप्राप्त व विद्यापीठाने शिफारस केलेले बियाणे वापरावे, उत्पादनात हमखास वाढ होण्यासाठी कृषी विभागाने सुचविलेल्या वाणांचीच पेरणी केली पाहिजे. त्याचबरोबर कृषी विभागाने तयार केलेले वनराई बंधारे, शेततळी यांचा शेवटच्या टप्प्यात अथवा पावसाने दडी मारल्यास अधिक फायदा देखील होणार आहे. शासनाच्या विविध शेतीपूरक योजनांकामी गावनिहाय प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. मंडळ निहाय क्षेत्रासाठी १० टन युरिया ब्रिकेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. अनुदानित बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे.

अंदाजे ७४२५१ मेट्रिक टन उत्पादन येईल पुरेसा पाऊस पडणार असल्याने चालू सन २०२१ हंगामात २८५०४ हेक्टर भात, चारशे हेक्टर नागली, ८४३ वरई, १८१ भुईमूग, सोयाबीन ९२७, खुरासणी १४४ लागवडीसाठी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. भात लागवडीतून अंदाजे ७४२५१ मेट्रिक टन उत्पादन येवू शकेल.

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी भरारी पथके निर्माण केले आहेत. त्यानुसार थेट गुन्हे दाखल केले जातील. शेतकऱ्यांनी पक्के बिल, स्टॅग, पेरणीतील वाणातील काही बियाणे शिल्लक ठेवावी. फसवणूक झाल्यास थेट तालुका कृषी कार्यालय, कृषी सहाय्यक अथवा थेट तालुका ग्राहक पंचायत कार्यालयाकडे आपणास करता येणार आहे. - शीतलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com