Nashik Ganesh Visarjan : दादा भुसेंच्या उपस्थितीत गणपती विसर्जन मिरवणूकीस सुरवात

Nashik Ganesh Visarjan : दादा भुसेंच्या उपस्थितीत गणपती विसर्जन मिरवणूकीस सुरवात

Nashik Anant Chaturdashi : शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणूकीची सुरवात राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ढोल, ताशांच्या निनादात व टाळ मृदृंगाच्या गजरात उत्साहात सुरूवात झाली. (presence of Dada Bhuse Ganpati Visarjan procession begins nashik news)

मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील विविध गणपती मंडळांनी सहभाग नोंदविला. यावेळी आमदार प्रा.देवयानी फरांदे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आवेश पलोड, यांच्यास‍ह शहरातील विसर्जन मिरवणूकीसाठी सहभागी गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेऊन निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी गणेश मंडळांना केले.

Nashik Ganesh Visarjan : दादा भुसेंच्या उपस्थितीत गणपती विसर्जन मिरवणूकीस सुरवात
Ganesh Visarjan : गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त, लालबाग-परळमधील मिरवणुकीसाठी विशेष व्यवस्था

स्वत: ढोल वाजवत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केला मिरवणूकीस प्रारंभ

सुरवातीला महापालिकेच्या शासकीय मानाच्या गणपतीची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर थेट मिरवणूकीत सहभागी होवून पालकमंत्री दादाजी भुसे यांनी स्वत: ढोल वाजवून मिरवणूकीस प्रारंभ केला.

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ असा जयघोष करत गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेशमंडळांना आणि भाविकांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री.भुसे यांनी उपस्थितांना केले.

Nashik Ganesh Visarjan : दादा भुसेंच्या उपस्थितीत गणपती विसर्जन मिरवणूकीस सुरवात
Nashik Anant Chaturdashi : गणेश विसर्जनासाठी 27 नैसर्गिक, 56 कृत्रिम तळे; सोसायटीसाठी ‘टँक ऑन व्हील’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com