Private Coaching Classes : क्‍लासचालकांना हवी स्‍पष्टता, पालकांना कार्यवाहीची अपेक्षा

केंद्र शासनाच्‍या शिक्षण विभागाने जारी केलेल्‍या खासगी क्‍लासेस संदर्भातील अध्यादेशाबाबत शुक्रवारी (ता.१९) विविध स्‍तरावर प्रतिक्रिया उमटल्‍या.
Private Coaching Classes
Private Coaching Classesesakal

Private Coaching Classes : केंद्र शासनाच्‍या शिक्षण विभागाने जारी केलेल्‍या खासगी क्‍लासेस संदर्भातील अध्यादेशाबाबत शुक्रवारी (ता.१९) विविध स्‍तरावर प्रतिक्रिया उमटल्‍या.

अध्यादेश अर्धवट असून, सखोल व सुस्‍पष्ट असा मसुदा जाहीर करण्याची अपेक्षा क्‍लासेसचालक, संचालकांनी व्‍यक्‍त केली. (private coaching Classes leaders want clarity with parents nashik news)

तर तरतुदींची अंमलबजावणी करण्यासंदर्भात केवळ घोषणा नको, तर कार्यवाही व्‍हावी, अशी अपेक्षा पालकांनी व्‍यक्‍त केली आहे. खासगी क्‍लासेसवर नियंत्रणाच्‍या उद्देशाने व पालक-विद्यार्थ्यांची दिशाभूल रोखण्याच्‍या उद्देशाने अध्यादेश जारी करत असल्‍याचे सांगण्यात आले होते. यातील काही तरतुदींना क्‍लासचालकांनीही तत्‍वतः सहमती दर्शविली आहे.

टायअप क्‍लासेसला विरोध, क्रमांकासंदर्भातील फसव्‍या माहितीचा अटकाव करण्यासंदर्भात समर्थन दर्शविले आहे. तर १६ वर्षांच्‍या अटीसंदर्भात संभ्रम व्‍यक्‍त करत यामुळे शालेय स्‍तरावरील विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे. दुसरीकडे पालकांकडून काही तरतुदींचे स्‍वागत होत आहे.

यात प्रामुख्याने शुल्‍काचा परतावा मिळण्याची तरतूद स्‍वागतार्ह असल्‍याचे म्‍हटले आहे. तसेच चुकीची माहिती देणाऱ्या क्‍लासचालकांना चाप लागणार असल्‍याचेही पालकांचे म्‍हणणे आहे. मात्र अध्यादेशाच्‍या अंमलबजावणीसाठी प्रभावी यंत्रणा विकसित करण्याची अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे.

Private Coaching Classes
Coaching Classes: कोचिंग क्लासेसमध्ये आता १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही; केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना

''शिक्षकांना शाळाबाह्य कामे लावली जात असल्‍याने या शाळांमधील अध्ययनाचा सुमार दर्जा राहतो. विद्यार्थ्यांनी क्‍लास लावल्‍याशिवाय निकाल चांगला लागू शकत नाही, हा आमचा दावा आहे. केंद्र शासनाच्‍या अध्यादेशातील मसुदा अर्धवट असून, काही बाबींना आमचा विरोध आहे.''- जयंत मुळे, अध्यक्ष, कोचिंग क्लासेस संचालक संघटना.

''कोचिंग क्लासेससाठी मार्गदर्शक तत्त्वे विद्यार्थी, क्लासेस चालकांसाठी स्वागतार्ह आहेत. परंतु त्यात काही बाबींचे स्पष्टीकरण नाही. १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना क्लासमध्ये प्रवेश नाही, यामुळे संपूर्ण देशात गोंधळाचे वातावरण आहे. हा मुद्दा सरकारने स्पष्ट करावा. केंद्र सरकारने अध्यादेशाबाबत व्यवस्थित मार्गदर्शन करावे.''- सीए लोकेश पारख, सरचिटणीस, जिल्हा कोचिंग क्लासेस चालक संघटना.

''चांगले गुण मिळविण्यासाठी स्‍पर्धा वाढत असून, कामगिरी उंचावण्यासाठी क्‍लासेसची सहाय्यता होते. याचा फायदा घेत काही क्‍लासेस मनमानी शुल्‍क आकारतात. त्‍यावर नियंत्रण आणण्याची तरतूद या अध्यादेशात असणे अपेक्षित आहे. क्‍लासेसच्या अस्‍तित्‍वावर संकट येईल, अशा तरतुदींचा पुनर्विचार झाला पाहिजे.''- प्रवीण कोथमिरे, पालक.

''सध्या शालेय स्‍तरापासूनच शिकवणीची गरज भासते आहे. असे असले तरी क्‍लासचालकांनी सर्व सुविधा पुरविणे अपेक्षित आहे. अध्यादेशामुळे विद्यार्थी, पालकांना त्‍यांचे अधिकार मिळण्यास मदत होईल, असे वाटते.''- कैलास फटांगळे, पालक.

Private Coaching Classes
Private Coaching Classes : खासगी शिकवण्यांबाबतचा मुद्दा अधिवेशनात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com