esakal | ..तर कोविड सेंटर बंद करावे लागणार? शहरासाठी चिंताजनक बाब

बोलून बातमी शोधा

private covid centre closed due to lack of oxygen supply
..तर कोविड सेंटर बंद करावे लागणार? शहरासाठी चिंताजनक बाब
sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक ) : शहरात झाकीर हुसेन रुग्णालयात झालेली दुर्घटना ताजी असतानाच ऑक्सिजन अभावी शहरातील दोन ते तीन खासगी कोविड रुग्णालय बंद करावे लागू शकतात. यामुळे वाढत्या रुग्णसंख्येत असा निर्णय शहरासाठी चिंताजनक बाब आहे.

प्रशासनाने वेळीच योग्य ती भूमिका घ्यावी

काही दिवसांपासून सिडकोतील खासगी हॉस्पिटलला ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. वारंवार मागणी करूनही ऑक्सिजन सिलिंडर मिळण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. बुधवारी (ता.२१) ऑक्सिजनचा पुरवठा होऊ न शकल्याने सिडकोतील अनेक रुग्णांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा सल्ला देण्यात आला. पुढील दोन दिवसात ऑक्सिजन न मिळाल्यास नाइलाजास्तव सिडकोतील काही खासगी रुग्णालय असलेले कोविड सेंटर नाइलाजास्तव बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झाली आहे. याकरिता प्रशासनाने वेळीच योग्य ती भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा डॉक्टर वर्ग व्यक्त करीत असल्याचे मत डॉ. वैभव महाले यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : .....तर यामुळे घडले असावे मृत्यूतांडव!

काही दिवसांपासून ऑक्सिजन पुरवठा विस्कळित झालेला आहे. बुधवारी ऑक्सिजन अभावी आम्हाला रुग्णांना नाही म्हणून सांगावे लागले. ते रुग्ण इतर ठिकाणी हलवण्याचा सल्ला नातेवाइकांना दिला. पुढील दोन दिवसात परिस्थिती न निवळल्यास नाइलाजास्तव कोविड सेंटर बंद करावे लागेल.
डॉ. वैभव महाले, संचालक, कल्पतरू हॉस्पिटल

हेही वाचा: Breaking : धक्कादायक! नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा