"खाजगी डॉक्टरांना सेवा सुरू करावीच लागणार " - आरोग्यमंत्री राजेश टोपे

rajesh tope 1.jpg
rajesh tope 1.jpg

नाशिक : "मालेगावात खाजगी डॉक्टरांना सेवा सुरू करावी लागणार असून याबाबत कुठलीही कारणं कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. वेळ पडल्यास पी पीकीट देणार मात्र सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे. यासाठी मालेगावात जाऊन मी आढावा घेणार". असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ते आज नाशिक दौऱ्यावर असून गृहमंत्री अनिल देशमुख, कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, मालेगावमध्ये वाढती रुग्णसंख्या व कायदा सुव्यवस्था याबाबत आढावा घेतला

पोलिसांनी स्वतः काळजी घेणे आवश्यक

पोलिसांनी स्वतः काळजी घेणे आवश्यक आहे. बाधित होणार नाही याचा प्रयत्न तरी करावा. केंद्राने जरी प्लाजमा थेरपी नाही म्हटली असली तरी येत्या काळामध्ये आम्ही प्लाजमा थेरपीचा उपयोग करणार आहोत

लॉकडाऊन ग्रीन झोनमध्ये सुरु राहणार

लॉकडाऊन ग्रीन झोनमध्ये सुरु राहणार. रेड झोन'मध्ये कायम लोक डाऊन राहणार त्याबद्दल शंका नाही. सरकार आर्थिक संकटात आहे त्यामुळे उद्योग सुरू करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे तरच उद्योग सुरु होऊ शकतात. राज्यात जास्तीत जास्त टेस्टिंग झाल्यास कोरोना नियंत्रणात येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com