esakal | मंदिरे उघडण्याबाबत हिंदू संघटनांचा आक्रमक पवित्रा; करणार ठिय्या आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

pro hindu organizations are aggressive for temple reopen in nashik marathi news

गत साडेपाच महिन्यांपासून बंद असलेल्या मंदिरांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यसाठी आज दुपारी गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या कार्यालयात या संघटनांची बैठक बोलाविण्यात आली होती.

मंदिरे उघडण्याबाबत हिंदू संघटनांचा आक्रमक पवित्रा; करणार ठिय्या आंदोलन

sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक/पंचवटी : कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या अनेक आस्थापना सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. दुसरीकडे हिंदु धर्मियांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे अद्यापही बंदच आहेत. ती उघडण्यासाठी गंगा गोदावरी पुरोहित संघासह अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या शुक्रवारी (ता.२८) कपालेश्‍वर मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 

गत साडेपाच महिन्यांपासून बंद असलेल्या मंदिरांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यसाठी आज दुपारी गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या कार्यालयात या संघटनांची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक आस्थापनांना पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र टप्प्प्याटप्प्याने ही बंदी मागे घेतलेली असलीतरी ‘देऊळबंदी’ अद्यापही कायमच असल्याकडे अनेकांनी लक्ष वेधले. याबाबत पालकमंत्र्यांना वारंवार निवेदने देऊनही उपयोग झालेला नाही, त्यामुळे मंदिरे उघडण्याबाबत हिंदुत्ववादी संघटनानी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

शासनाने परवानगी दिली नाही, तरीही मंदीरांचे दरवाजे उघडण्याबाबत काही जणांनी आक्रमक पवित्रा घेतला. बैठकीला पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, महंत भक्तीचरणदास महाराज, सुधीरदास पुजारी, हिंदु एकता आंदोलन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रामसिंग बावरी, ॲड. अविनाश गाढे, विनोद थोरात, धनंजय पुजारी, अतूल शेवाळे, आदींसह हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

संपादन - रोहित कणसे
 

loading image
go to top