जिममध्ये महिलांचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gym

नाशिक : जिममध्ये महिलांचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : बदलत्या काळानुसार महिला ‘फिटनेस’वर भर देत आहेत. महिलांची पावले आता फिटनेससाठी जीमकडे वळत असल्याचे दिसत आहे. महिलांचे वजन वाढल्यानंतर महिला व्यायामाला सुरवात करत होत्या, परंतु गेल्या दोन वर्षापासून महिला आरोग्याबाबत सजग झाल्या असून आहारासोबत, शरीराची काळजी घेण्याचे प्रमाण महिलांमध्ये वाढले आहे. महिलांनी व्यायाम केल्यास अनेक आजारांना आपण दूर करू शकतो. कोरोनानंतर नाशिकमधील जीममधील महिलांचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांनी वाढले आहे.

आरोग्याची काळजी घेण्यासोबत व्यायामात लागणाऱ्या सर्व गोष्टींचे पालन महिला करत आहेत. टीव्ही, मोबाईल, बाहेरील पदार्थ खाल्यामुळे वजन वाढते. वजन वाढल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे आयुष्याचा एक भाग म्हणून व्यायामाकडे कल वाढतो आहे. महिलांच्या वयोगटानुसार व्यायामात प्रोटीन, कॅलरी यासह महिलांच्या शरिररचने नुसार व्यायाम वेगवेगळा ठरतो. कमी वेळात स्लिम व सुंदर दिसण्यासाठी अवघड व्यायामालाही पसंती देत आहेत. महिलांनी जिममध्ये प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या देखरेखीत व्यायाम केल्यास त्यांना लठ्ठपणा आदींसह इतर आजारांपासून दूर राहता येईल.

हेही वाचा: लसीकरणासाठी टिमवर्क म्हणून काम करा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

अनेक महिलांना बसून काम करावे लागत असल्याने पाठीच्या व गुडघ्याच्या समस्या उद्भवतात. मशिनवर चालणे, धावणे, सायकलिंग, पॉवर लिफ्टिंग, डंबेल्स, स्टनिंग सायकल आदी साधनांचा वापर महिलांसह तरुणी प्रशिक्षण घेत आहे.

'महिला आधी जिममध्ये व्यायाम करण्यास टाळाटाळ करत होत्या. परंतु, कोरोनानंतर महिलांमधील व्यायामाबद्दलची जागरूकता वाढली आहे. महिलांनी जिममध्ये प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या देखरेखीत व्यायाम केल्यास त्यांना लठ्ठपणा आदींसह इतर आजारांपासून दूर राहता येईल.'

- सय्यद मोही, जीम ट्रेनर

loading image
go to top