esakal | 'वसाका'च्या संरक्षक भिंतीला तिसऱ्यांदा भगदाड; कारखान्याचे भवितव्य धोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

vasaka.jpg

संरक्षक भिंतीला तिसऱ्यांदा भगदाड पडल्याने कारखान्याचे भवितव्य धोक्यात आले असून, कारखान्याच्या सुरक्षेचा प्रश्न कायम असल्याची भावना सभासद व कामगारांत व्यक्त होत आहे. वसाका कारखान्याच्या दक्षिण बाजूला असलेल्या उंच संरक्षक भिंतीला जागोजागी भगदाड पडत असल्याने कोट्यवधीची मालमत्ता धोक्यात आली आहे.

'वसाका'च्या संरक्षक भिंतीला तिसऱ्यांदा भगदाड; कारखान्याचे भवितव्य धोक्यात

sakal_logo
By
मोठाभाऊ पगार

नाशिक : (देवळा) वसाका कारखान्याच्या संरक्षक भिंतीला तिसऱ्यांदा भगदाड पडल्याने कारखान्याचे भवितव्य धोक्यात आले असून, कारखान्याच्या सुरक्षेचा प्रश्न कायम असल्याची भावना सभासद व कामगारांत व्यक्त होत आहे. वसाका कारखान्याच्या दक्षिण बाजूला असलेल्या उंच संरक्षक भिंतीला जागोजागी भगदाड पडत असल्याने कोट्यवधीची मालमत्ता धोक्यात आली आहे.

अवसायक राजेंद्र देशमुख यांनी केली पाहणी 
 
मागील पंधरवड्यात पाडलेले खिंडार काटे लावून बंद करण्यात आले होते; परंतु २५ ते ३० फूट लांब भिंत पडली असल्याने सुरक्षायंत्रणा धास्तावली आहे. यातच सुरक्षा कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांची संख्या मर्यादित आहे. त्यांना वेळेवर वेतन उपलब्ध करून देण्यात आले तर ते व्यवस्थित लक्ष देतील, असे अवसायक राजेंद्र देशमुख यांच्या निदर्शनास वसाका मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव, युनियन अध्यक्ष अशोक देवरे यांनी आणून दिले. या हंगामात कुठल्याही परिस्थितीत वसाका सुरू करणे गरजेचे आहे, असे ठाम मत व्यक्त करीत वसाकाच्या युनियन पदाधिकाऱ्यांनी अवसायक राजेंद्र देशमुख यांना या वेळी गळ घातली. 

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

जमीनधारक कामगारांना भेट
 
वसाकाला ज्यांनी जमिनी दिल्या अशा जमीनधारक कामगारांनीही अवसायक राजेंद्र देशमुख यांची भेट घेतली. या वेळी कामगारांनी थकीत वेतन मिळावे व वसाका सुरू करण्यासाठी निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य शिखर बॅंकेकडून आजारी कारखान्यांना कर्जपुरवठा उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने नजीकच्या काळात लवकरच कारखाना सुरू होण्याची अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. 

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

संपादन - किशोरी वाघ

loading image
go to top