महापालिका हाय ॲलर्टवर; कोव्हीड सेंटरसह रुग्णवाहिकांमध्येही ऑक्सिजनची व्यवस्था

oxygen ambul.jpg
oxygen ambul.jpg

नाशिक : शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कोव्हीड सेंटर मध्ये खाटांची संख्या वाढविली जात आहे. त्याचबरोबर आता रुग्णवाहिका व कोव्हीड सेंटर मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्या सुचना देताना आता पर्यंत वापरण्यात आलेला ऑक्सिजनची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मागविल्याने वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिका हाय ॲलर्ट मध्ये आल्याचे दिसून येत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता
एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतं गेली. ऑगष्ट महिन्यात कोरोनाने उच्चांक पातळी गाठताना वीस हजारांच्या पार आकडा गेला आहे. शासनाच्या एका अहवालानुसार कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. यापार्श्‍वभूमीवर महापालिकेने कोव्हीड सेंटरची संख्या वाढविताना सध्या सुरु असलेल्या सेंटर मध्ये बेड वाढविण्यास सुरुवात केली आहे. आता त्याचबरोबर ऑक्सिजनची माहिती घेतली जात असून आतापर्यंत किती ऑक्सिजन वापरला गेला. सद्यस्थितीत किती साठा उपलब्ध आहे. व भविष्यात किती प्रमाणात गरज पडेल याची माहिती मागविण्यात आली आहे.

रोजच्या ऑक्सिजन वापराची होणार नोंद

कोरोना रुग्णची संख्या वाढतं असताना यातील बहुतांश रुग्ण हायरिस्क मध्ये असल्याने त्यांना तातडीने ऑक्सिजनची आवशक्यता भासते त्यामुळे डॉ. जाकीर हुसेन रूग्णालय, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे मेडीकल काॅलेजमध्ये ऑॅक्सिजन बेड वाढविण्याच्या सुचना देताना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये देखील ऑक्सिजन सिलींडर खरेदी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रोजच्या ऑक्सिजन वापराची नोंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

रुग्णवाहिकांमध्येही ऑक्सिजन सिलिंडर
रुग्णवाहीका व शववाहीका वेळेवर पोहोचतं नाही व अमरधाम मध्ये कोव्हीड रुग्णांचे प्रेत जाळण्यास विलंब होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जीपीएस यंत्रणा बसविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आता त्याचबरोबर रुग्ण व शववाहीकांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर बसविण्याच्या सुचना विभागिय अधिकायांना देण्यात आल्या आहेत.

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com