SAKAL Impact : अखेर उपसा करणारा पंप दुरुस्त; नांदगावचा पाणीपुरवठा होणार पूर्ववत

Technical staff installing faulty VT pump at Girna Dam.
Technical staff installing faulty VT pump at Girna Dam.esakal

नांदगाव (जि. नाशिक) : गिरणा धरणावरील नादुरुस्त झालेला व्हीटी पंप दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर काम करत तो दुरुस्त करण्यात आला. नादुरुस्त झालेला जॅकवेलचा पंप काढण्यात येऊन त्याठिकाणी नवा पंप टाकण्यात आला.

बावीस दिवसापासून विस्कळीत झालेला सतरा गावासह शहराचा पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्यास मदत झाली नांदगावच्या जलकुंभात अपेक्षित दाबाने त्यामुळे पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. (pump finally fixed Water supply to Nandgaon will be restored SAKAL Impact Nashik News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Technical staff installing faulty VT pump at Girna Dam.
Dhule News : सण, उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावे; शांतता समितीच्या बैठकीत सूर

बावीस दिवसापासून ५६ खेडी नळपाणी पुरवठा योजना विस्कळित असताना सोमवारी (ता.२७) उद्भव विहिरीवरील उपसा करणाऱ्या १८० अश्वशक्तीच्या तीनपैकी दोन पंप नादुरुस्त झाल्याने शहरासह लगतच्या सतरा गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता.

अनेकदा त्यांच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत काही वेळा नवे व्हीटी पंप बसविण्यात आले तरीही सलग उपशामुळे तेही खराब झाले होते. त्यामुळे नांदगावकरांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.

याबाबत वृत्त ‘सकाळ’ प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करत नादुरुस्त झालेला व्हीटी पंप दुरुस्त करत जॅकवेलच्या ठिकाणी नवीन पंप टाकण्यात आला.

Technical staff installing faulty VT pump at Girna Dam.
Nashik News : खामखेड्यात काठेकावड उत्साहात सुरवात; 2 वर्षाच्या खंडानंतर ग्रामस्थांकडून जय्यत तयारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com