चुका लपविण्यासाठी बांधकाम विभागाचा अजब दावा; 75 मिलिमीटर पावसाने शहर तुंबले | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water filled on raods latest rain news

चुका लपविण्यासाठी बांधकाम विभागाचा अजब दावा; 75 मिलिमीटर पावसाने शहर तुंबले

नाशिक : जवळपास दोन तास गुरुवारी (ता. ५) पडलेल्या पावसाने अनेक भागात गुडघाभर पाणी साचल्याने महापालिकेच्या पावसाळी गटार योजनेचे पितळ उघडे पडले. मात्र, त्यावर पांघरून घालण्यासाठी बांधकाम विभागाने ७५ मिलिमीटर पाऊस पडल्याचा अजब दावा केला आहे. (pwd Strange Claim to Conceal Mistakes 75 millimeters of rain inundated city nashik latest marathi news)

शहरात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून जवळपास दीडशे किलो किलोमीटर भूमिगत पाइपलाइन टाकली आहे. मात्र, असे असतानाही दर वर्षी पाण्याखाली शहर जाते. गुरुवारीदेखील सांयकाळी जवळपास दोन तास मुसळधार पाऊस पडला.

या पावसामुळे महापालिका मुख्यालयाचा परिसर, मायको सर्कल, सीबीएस, अशोक स्तंभ, त्र्यंबक नाका, दहिपूल परिसर, सराफ बाजार, कॉलेज रोड, औद्योगिक वसाहत, सातपूरचे शिवाजीनगर बसस्टॉप, प्रभाग सहामधील आसाराम बापू रोड, रासबिहारी रोड, मखमलाबाद रोड, हनुमान वाडी जलकुंभ, नाशिक रोड भागात बिटको चौक, फेम सिनेमा चौक आदी भागात पाणी साठले.

हेही वाचा: प्रमोद महाजन उद्यानाची भिंत कोसळली

बांधकाम विभागाकडून चेंबरचे ढापे उघडून पाणी मोकळे केल्याने तासाभरात परिस्थिती पूर्वपदावर आली. असे असले तरी यानिमित्त पावसाळी गटारी योजनेचे काम योग्यरीतीने झाले नाही, तसेच भविष्यातील अंदाज लक्षात न घेता फक्त खर्च करण्याकडेच लक्ष दिल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. मात्र, चुकांकडे दुर्लक्ष करताना बांधकाम विभागाकडून ७५ मिलिमीटर पाऊस अवघ्या तासाभरात झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

"महापालिकेकडून पावसाळी गटार योजना राबविण्यात आली. पावसाळी गटारात एका तासाला २७ मिलिमीटर पाऊस पडल्यास तेवढे पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. मात्र, गुरुवारी अवघ्या दोन तासात ७५ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे गटारीतून विसर्ग न झाल्याने पाणी वर आले. असे असले तरी तातडीने पाण्याचा निचरा करण्यात यश आले. "

- शिवकुमार वंजारी, शहर अभियंता.

हेही वाचा: Nashik : अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा संशयित जेरबंद

Web Title: Pwd Strange Claim To Conceal Mistakes 75 Millimeters Of Rain Inundated City Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..