Nashik : उद्यान विभागाचीही गुणवत्ता नियंत्रणा बाहेर; 'त्या' गमतीजमतीची जोरदार चर्चा

NMC News
NMC News esakal
Updated on

नाशिक : महापालिकेचा गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून फक्त स्थापत्य विषयक कामांची गुणवत्ता तपासली जाते असे नाही तर उद्यान विभागाच्या कामांचीदेखील तपासणी होते. मात्र, गुणवत्ता व नियंत्रण विभागाने उद्यानाच्या कामातही चांगलाच हात मारला आहे.

देखभाल- दुरुस्तीची कामे निर्धारित अटी, शर्ती आणि नियमांनुसार होत नाहीत. ही कामे करताना नियमबाह्य पद्धतीने कामे केली जात आहेत. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. किमान गुणवत्ता नियंत्रण विभागाचे नियंत्रण राहणे आवश्यक आहे. (quality control of park department is out of control Nashik Latest Marathi News)

NMC News
Nashik Accident : अनेकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग; तातडीने दिले आदेश

याकडे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. महापालिकेचा गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे अनेक सुरस कथा समोर येत आहे. स्थापत्य विषयक कामांमध्ये वाढविलेली टक्केवारी हा विषय तर आहेच, मात्र कामांमध्येदेखील ठेकेदार हिताय धोरण राबविले जात आहे. कामांची सुमार गुणवत्ता ही बाब तर आहेच, मात्र ठेकेदारांचे कामासाठी लागणारे मटेरिअल वाचविण्यातदेखील गुणवत्ता व नियंत्रण विभाग आघाडीवर आहे.

जसे की खडक लागला नसताना खडक लागल्याचे दर्शवून बिले काढणे, चेंबरचे आतून व बाहेरून प्लास्टर करणे करारात नमूद असतानाही प्लास्टर न करताच बिले काढण्यास मंजुरी देणे, रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम असतानाही त्या कामाला गुणवत्तेच्या चौकटीत बसविणे, मापांमध्ये फेरफार करणे, मेजरमेंट बुकमध्ये चुकीच्या मापांची नोंद घेणे. यासारखे हात मारण्याच्या गमतीजमतीची जोरदार चर्चा आहे. आता स्थापत्य कामाबरोबरच उद्यानांच्या कामांमध्येदेखील हातसफाई करण्याचे उद्योग समोर येताना दिसत आहे.

NMC News
Nashik Bus Accident : नाशिकमध्ये अग्नितांडव सुरूच; पुन्हा एक बस पेटली, Video Viral

अॅडजेस्टमेंट करण्याचा फंडा

गेल्या दोन अडीच वर्षात रस्त्यांवर जवळपास साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनही यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांची सुमार गुणवत्ता समोर आली. या सर्व प्रकाराला गुणवत्ता व नियंत्रण विभाग कारणीभूत आहे. या विभागात नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी टक्केवारीचा दर वाढविल्याने मेटाकुटीला आलेल्या ठेकेदारांनीदेखील कामात बॉम्बे हात मारून आपले ईप्सित साध्य करून घेतले.

गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून उद्यान विभागाच्या कामातदेखील बॉम्बे आहात मारण्याचे उद्योग केले आहे. उद्यान विभागात होणारी देखभाल दुरुस्तीची कामे निर्धारित अटी, शर्ती आणि नियमांनुसार होत नाहीत. उद्यान विभागातील मोठ्या रकमेची टेंडर काढली जात आहेत. या कामांची गुणवत्ता तपासणी करताना त्यात अॅडजेस्टमेंट करण्याचा फंडा गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून अवलंबला जातो.

NMC News
Nashik Bus Fire: ''जाग आली अन् बघतो तर..."; बसमधील छोट्या आर्यनचा थरारक अनुभव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com