esakal | Mahashivratri 2020 :  त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात महाशिवरात्रीला प्रवेश?

बोलून बातमी शोधा

Trimbakeshwar_nj.jpg

कुठली अप्रिय घटना घडल्यास, संबंधित घटनांची जबाबदारी देवस्थान ट्रस्टवर येणार आहे. तर महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी साक्षात शिवाच्या गर्भगृहात भाविकांना प्रवेश नाकारला, तर ते भाविकांच्या पचनी पडेल का? याचाही विचार देवस्थानला करावा लागणार आहे. त्यामुळे देवस्थानची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. 

Mahashivratri 2020 :  त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात महाशिवरात्रीला प्रवेश?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्‍वरला शुक्रवारी (ता.21) महाशिवरात्रीला गर्दी होणार आहे. दर वर्षी सातत्याने वाढणाऱ्या गर्दीचे नियंत्रण दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. अशा स्थितीत महाशिवरात्रीला गर्दीच्या दिवशी त्र्यंबकराजाच्या गर्भगृहात भाविकांना प्रवेश द्यावा की नको? असा विषय पुढे आला. गर्दी नियंत्रणाचे नियोजन करणाऱ्या ग्रामीण पोलिसांनी यात स्पष्ट भूमिका घेत स्थानिक व बाहेरील भाविकांच्या गर्दीमुळे अप्रिय घटना मंदिरातील चेंगराचेंगरीसदृश स्थिती टाळण्यासाठी गर्भगृहात प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी केली. 

संबंधित घटनांची जबाबदारी देवस्थान ट्रस्टवर

जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह यांनी जिल्हा प्रशासनाला त्याविषयीचे पत्र पाठवत महाशिवरात्रीला पहाटे चार ते सात या वेळेत त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद ठेवावा, अशी विनंती केली आहे. जिल्हा प्रशासनाने त्र्यंबकेश्‍वर देवस्थानला पत्र पाठवून गर्भगृहात प्रवेश बंद ठेवण्याचे आवाहान केले आहे. कुठली अप्रिय घटना घडल्यास, संबंधित घटनांची जबाबदारी देवस्थान ट्रस्टवर येणार आहे. तर महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी साक्षात शिवाच्या गर्भगृहात भाविकांना प्रवेश नाकारला, तर ते भाविकांच्या पचनी पडेल का? याचाही विचार देवस्थानला करावा लागणार आहे. त्यामुळे देवस्थानची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. 

हेही वाचा > PHOTOS : "तूच का पेटवून घेते, मीच पेटवून घेतो' असे म्हणून तिच्या हातातील बाटली ओढली...पण...

ग्रामीण पोलिसांकडून जिल्हा प्रशासनाला विनंती  
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी आहे. मात्र प्रशासनाने अजून तरी त्याविषयी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मंदिरात होणाऱ्या गर्दीच्या ताणाबाबत माहिती घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी 

हेही वाचा > "माझ्यासोबत गाडीवर चल" असे सांगून तिला घरी घेऊन गेला..अन्..