
नाशिक : शाळा- महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाही दाखल्यांचा विषय मात्र प्रलंबितच आहे. अजूनही २० हजार ९६९ दाखले प्रलंबित आहेत. एक लाख ३३ हजार ५८२ दाखल्यांपैकी एक लाख ११ हजारांहून अधिक दाखले दिल्यानंतरही प्रलंबित दाखल्याची संख्या वीस हजारांच्या पुढे आहे. अभियांत्रिकी पदविका प्रवेशांना सुरवात झाली आहे.
एकवीस हजार दाखल्यांचा प्रश्न प्रलंबित
पदवी प्रवेशही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे दीड महिन्यापासून प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी हजारो अर्जांची संख्या वाढली आहे. सेतू बंद झाले आहे. महाऑनलाइन ई- सेवा केंद्रावरून किंवा ‘आपले सरकार’ पोर्टलवरून अर्ज करायची सोय असल्याने कोरोनाच्या संचारबंदीत ठिकठिकाणी ऑनलाइन अर्ज करायला विद्यार्थी, पालकांची गर्दी होत आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचे पैस याच काळात जमा होत असल्याने केंद्रांवर गर्दी होत आहे. थेट बँक खात्यात जमा होणाऱ्या पैशांसाठी बँक खाते आधार लिंक असणे गरजेचे आहे, पण त्यासाठी तीन महिन्यांपासून आधार केंद्रच बंद असल्याने आधार अपडेट करण्यासाठी ऑनलाइन सेवा केंद्रावर गर्दी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सगळ्या गर्दीत दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांची मात्र फरपट होत आहे.
गर्दीत दाखल्यांसाठी विद्यार्थी, पालकांची फरपट
दाखल्याचे प्रकार एकूण अर्ज प्रलंबित दिलेले दाखले नामंजूर दाखले
राष्ट्रीयत्व आणि अधिवास २२८५९ ४०२८ १८७५८ ७३
जातीचे दाखले १५८७४ ५३५४ १०२३७ २८३
उत्पन्नाचे दाखले ८३०९७ ८५८४ ७४२९४ २१९
नॉन क्रिमिलेयर ११७५२ ३००३ ८६७३ ७६
एकूण १३३५८२ २०९६९ १११९६३ ६५१
संपादन : रमेश चौधरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.