Nashik Crime : तेलंगवाडीत गावठी दारूअड्ड्यांवर छापा

crime news
crime newssakal

Nashik Crime News : तेलंगवाडीतील गावठी हातभट्टीच्या दारूअड्ड्यांवर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई केली आहे. यात ९० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. (Raids on village alcohol place in Telangwadi nashik crime)

याप्रकरणी संशयित अनिल हनुमंत जाधव (रा. फुलेनगर) याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, युनिट एकचे पोलिस हवालदार रामदास गंगाधर भडांगे यांना पेठ रोडवरील तेलंगवाडीत एक संशयित गावठी दारू अड्ड्यांबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शनिवारी (ता .६) फुलेनगर परिसरात कारवाई केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

crime news
Nashik Crime News : डिझेल चोरट्यांच्या टोळीला अटक; येवला तालुका पोलिसांनी लावला छडा

त्यात पोलिसांनी हातभट्टी दारू साठा व इतर मुद्देमाल असा एकूण ९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार भडांगे, सुरेश माळोदे, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, पोलिस नाईक मोतीराम चव्हाण, गौरव खांडरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

crime news
Nashik Bribe Crime : सुहास कांदेंकडे खंडणीची मागणी; नीलेश माईणकरांवर गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com