Nashik News : घरातून रेल्वेने आलेली मुलं पालकांच्या स्वाधीन; रेल्वे सुरक्षा बलाने जपली माणुसकी!

Lohmarg police officers and staff during the return home of the children found in the train
Lohmarg police officers and staff during the return home of the children found in the trainesakal

Nashik News : आज बालकांमध्ये कोणत्याही किरकोळ कारणावरून घर सोडून जाण्याची प्रवृत्ती वाढली आहे.

घरच्यांनी मोबाईल घेवुन दिला नाही,. परिक्षेत कमी गुण मिळाले, नापास झालो, भावा- बहिणीचे भांडण झाले. मित्रासोबत भांडण झाले. (Railway Security Force searched lost boys and girls on railway station and handed over to families nashik news)

आई- वडील सावत्र घरात त्रास होतो, अशा विविध कारणांनी मुले- मुली घर सोडून निघता. त्यांना एकच सहारा असतो, तो म्हणजे रेल्वे स्थानक अन्‌ रेल्वे गाड्या. अशा ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाने या मुला- मुलींचा शोध घेवुन मे महिन्यात १६३ मुलांना त्यांचा कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मुलांना वाचविण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहे. काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा दल जवान शोधून काढतात.

हे प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा दल कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांसह पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Lohmarg police officers and staff during the return home of the children found in the train
Nashik MVP 11th Admission : मविप्रच्या ग्रामीण महाविद्यालयांची या तारखेला अकरावीची पहिली यादी

सुटका करण्यात आलेल्या या १६३ मुलांमध्ये १३३ मुले आणि ३० मुलींचा समावेश असून त्यांना चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुन्हा जोडण्यात आले आहे.

विभागनिहाय संख्या अशी

मुंबई विभाग- ३४ मुले (२३ मुले आणि ११ मुली)

भुसावळ विभाग- ७८ मुले (७० मुले व ८ मुली)

नागपूर विभाग- १४ मुले (५ मुले आणि ९ मुली)

सोलापूर विभाग- ४ मुले (२ मुले व २ मुली)

पुणे विभाग- ३३ मुले (३३ मुले).

"ऑपरेशन मुस्कान अंतर्गत व्यक्तींची घरवापसी केली आहे. हरवलेले, घरसोडून आलेले अल्पवयीन मुले, मुली, व्यक्ती हे गुन्हेगारी, वाईट मार्गाला लागू नये, त्यांच्या हातून वाईट कृत्य घडू नये, यासाठी दक्ष राहून सापडलेल्या व शोधलेल्या मुलांना त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले आहे." - शरद जोगदंड, निरीक्षक, लोहमार्ग पोलिस

Lohmarg police officers and staff during the return home of the children found in the train
Loksabha Election : ‘भाजप’ च्या ‘सानप-आहेर’ लॉजिक ने कार्यकर्ते संभ्रमात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com