Railway Update : RDSO ची तपासणी झाल्यास नाशिक-कल्याण लोकल धावणार

Railway News
Railway Newsesakal

Nashik News : ‘आरडीएसओ’ लखनौ या संस्थेचे नाशिक-कल्याण लोकलसाठी इन्स्पेक्शन केल्यास नाशिक-कल्याण लोकल धावण्यास योग्य असेल, असे नाशिकचे रेल्वे इंजिनतज्ज्ञ वामन सांगळे यांनी सांगितले.

नाशिक-कल्याण लोकलचा विषय गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी लखनौची इन्स्पेक्शन करणारी संस्था म्हणजेच ‘आरडीएसओ’चे इन्स्पेक्शन लवकरच होणार आहे.

यासंबंधी वामन सांगळे यांनी सांगितले, की मुंबई येथील डीआरएम कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी हे इन्स्पेक्शन करण्यासाठी गतिमान पावले उचलत असून, लोकलचे इन्स्पेक्शन झाल्यावर ही लोकल नाशिक-कल्याण रेल्वेमार्गावर धावण्यास योग्य असणार आहे. (Railway Update Nashik Kalyan local will run if RDSO check Nashik News)

गेल्या पाच वर्षांपासून नाशिक-कल्याण लोकलचे गाजर नाशिककरांना दाखविण्यात आले होते. रेल्वे इंजिनतज्ज्ञ वामन सांगळे यांनी या प्रकल्पाची संकल्पना सर्वांत पहिले मांडली होती. त्या संकल्पनेचा आधार घेत खासदार हेमंत गोडसे यांनी लोकसभेत लोकलची मागणी केली होती.

नाशिक-कल्याण लोकलचा अहवाल श्री. सांगळे यांनी लिहिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या प्रवाशांना नाशिक-मुंबई प्रवास करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पाच वर्षांपासून रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करूनही रेल्वे बोर्ड दुर्लक्ष करीत आहे, म्हणूनच वंदे भारत मुंबई ते नाशिक रेल्वेमार्गावर धावते, तर लोकल धावायला काहीच अडचण नाही, असे रेल्वे इंजिनतज्ज्ञ वामन सांगळे यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Railway News
Railway : गाड्यांना उशीर चालेल; पण ट्रॅक सुरक्षितच हवा

अनिलकुमार लाहोटी यांच्या विरोधात तक्रार

रेल्वेचे निवृत्त लोको निरीक्षक आणि रेल्वे इंजिनतज्ज्ञ वामन सांगळे यांनी रेल्वे बोर्ड, नाशिक पोलिस, कल्याण पोलिस यांना पत्र देऊन अनिलकुमार लाहोटी यांच्या विरोधात तक्रार केली आहे. रेल्वेचे परीक्षण करणारी संस्था म्हणजेच ‘आरडीएसओ’ ला इन्स्पेक्शनसाठी ६ डिसेंबर २०२२ पर्यंत बोलवावे.

६ डिसेंबरनंतर राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान केले म्हणून मुंबई रेल्वेचे जीएम अनिलकुमार लाहोटी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे नाशिक-कल्याण मेमू लोकलच्या चाचणीकडे नाशिककरांचे लक्ष लागले असूनही लोकल सुरू झाल्यास आरोग्य, शिक्षण, उद्योग, सहकार, प्रशासन या क्षेत्रांना ऊर्जितावस्था मिळणार आहे.

Railway News
Railway : गाड्यांना उशीर चालेल; पण ट्रॅक सुरक्षितच हवा

"डीसी म्हणजेच डायरेक्ट करंट ते अल्टरनेटिव्ह करंट तंत्रज्ञानाचे रूपांतर होऊन अनेक दिवस झालेले आहेत. पाच वर्षांपासून पाठपुरावा करीत असून, RDSO (लखनौ)कडून लोकलची चाचणी होत नाही. कल्याण कारशेडला लोकल धूळखात पडली आहे. लवकरच आरडीएसओ लखनौ येथील अधिकाऱ्यांनी गतिमान चाचणी केल्यास नाशिकच्या विकासाला या लोकलमुळे ऊर्जितावस्था मिळेल."

-वामन सांगळे, रेल्वे इंजिनतज्ज्ञ

Railway News
Railway Chain Pulling Case : मे महिन्यात चेन ओढण्याचा 941 घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com