Nashik Rain Alert : इगतपुरीसह घोटीमध्ये 24 तासामध्ये अतिवृष्टी; 5 दिवस मध्यम पावसाचा अंदाज

Weather Update : इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे शनिवारपासून (ता. १) ५ जुलैपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Rain
Rainesakal

Nashik Rain Update : इगतपुरीसह घोटीमध्ये गेल्या २४ तासामध्ये प्रत्येकी १०१.८ मिलीमीटर इतकी अतिवृष्टी झाली आहे.

बागलाण, कळवण, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, पेठ आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे.

इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे शनिवारपासून (ता. १) ५ जुलैपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (rain update Heavy rain in 24 hours in Ghoti Igatpuri nashik news)

तसेच पेरणीयोग्य पाऊस झाला आहे, अशा ठिकाणी वापसा आल्यानंतर जमिनीतील ओलावा पाहण्यासोबत पुढील पावसाचा अंदाज घेत खरीपाच्या पेरण्या सुरु करण्याचा सल्ला केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. तसेच पेरणीपूर्वी बियाण्याची प्रक्रिया करावी, असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.

मॉन्सूनची हजेरी जिल्ह्यात सर्वदूर राहिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये आणि आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून (कंसात गेल्यावर्षीच्या जूनमधील पावसाची टक्केवारी दर्शवते) : मालेगाव-३.३-७०.९ (१९९.८), बागलाण-१६.४-५८.७ (१२८.४), कळवण-१८.३-७३.२ (११३), नांदगाव-०.४-४६.१ (१४६.४), सुरगाणा-५८.९-६६ (६५.८), नाशिक-१२.७-३६.४ (६५.२), दिंडोरी-१५.८-५५.१ (१०६), इगतपुरी-६५.५-४९.९ (२६.७), पेठ-५०.१-५२.१ (७२.१), निफाड-४.७-६९.९ (१०२.२), सिन्नर-७.८-४७ (११३.५), येवला-०.८-७५.६ (६३.९), चांदवड-२.७-३८.४ (१९३), त्र्यंबकेश्‍वर-५४.४-६९ (४४.१), देवळा-१.६-६०.३ (१४८.६).

जिल्ह्यात जूनमधील ३० दिवसांपैकी ८ दिवस पावसाचे राहिले असून आज सकाळपर्यंत ५३.८ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यातील मोठ्या ७ आणि मध्यम १७ अशा एकुण २४ धरणातील जलसाठा २१ टक्के आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rain
Rain Update : बांदा-आयी राज्यमार्गाची बाजूपट्टी खचली; वाहतुकीला धोका

गेल्यावर्षी जूनमध्ये २३ टक्के जलसाठा उपलब्ध होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या अधिक जलसाठा असलेल्या धरणातील साठ्याची टक्केवारी अशी : गंगापूर-२९, करंजवण-१३, मुकणे-३६, वालदेवी-१९, कडवा-१८, भोजापूर-११, चणकापूर-२८, हरणबारी-३५, केळझर-३३, पूनंद-३४. मालेगाव शहर आणि खानदेशसाठी पाणी उपलब्ध होणाऱ्या गिरणा धरणात सध्या २२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

खरीपासाठी शास्त्रज्ञांचा सल्ला

० ५ जुलैपर्यंत आकाश ढगाळ राहील

० तापमान कमाल २८ ते ३३ आणि किमान २२ ते २३ अंश सेल्सिअस

० वाऱ्याचा वेग तासाला २० ते २६ किलोमीटर

भात रोपवाटिका, नवीन लावलेली फळबाग व भाजीपाला पिकातून अधिकचे पाणी काढावे

० पावसाचे पाणी शेतात साठवण्याची उपाययोजना करावी

० भात, नागली, खुरासणी, वरई, सोयाबीन, मूग, उडीद व मका पिकांची पेरणी सुरु करावी

० कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी खरीप पिकाची पेरणी सुरु ठेवावी

० भात रोपवाटिकेत रोपांच्या वाढीसाठी नत्र खत द्यावे

० लवकर पेरणी केलेले शेत तणमुक्त ठेवावे

Rain
Mumbai Rain Update : आजही पाऊस झोडपणार! मुंबई, ठाण्यासह पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com