Rajya Balnatya Spardha : नाशिककर अनुभवताहेत बालनाट्यांची मेजवानी; 5 नाटकांचे सादरीकरण

Drama
Dramaesakal

नाशिक : परशुराम साईखेडकर नाट्यगृहात १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा मोठा उत्साहात सुरू आहे. शनिवारी (ता. ७) स्पर्धेत सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५ नाटकांचे सादरीकरण झाले. या वेळी बालनाट्यांना रसिक प्रेक्षकांनी मनमुराद दाद देत उपस्थिती नोंदविली.

सुरवातीला समिधा बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘बदला’ हे नाटक सादर झाले. सुरेश शेलार लिखित या नाटकाचे दिग्दर्शन पुनम पाटील यांनी केले. (Rajya Balnatya Spardha Nashikkar experiencing feast of balnatya Presentation of 5 plays nashik news)

श्‍लोक नेरकर, आर्यन बोलीज, अक्षरा आढाव, दिव्या कुलकर्णी, शर्वरी नांदोडे, अर्थ अहीर, आयुष जाचक, आदित्य पाटील, कलश शिंदे, कृष्णा जगताप, मुकुंद भारद्वाज, अवनी चव्हाण, पूर्वा आहिरे, वैदेही थोरात, सावी सोनवणे, आर्वी चौधरी, वैष्णवी रणमाळे, आयुष दाभाडे या बालकलाकारांनी या नाटकात अभिनय केला.

दुर्वाक्षी पाटील यांनी नाटकाचे नेपथ्य यासह पात्रांच्या रंगभूषा साकारल्या. चेतन ढवळे यांनी प्रकाशयोजना तर भूषण भावसार यांनी नाटकाला संगीत दिले. कावेरी जगताप यांनी वेशभूषा साकारली. नकुल, अनुज, तन्मय, नीलेश, जय आणि प्रथमेश यांनी रंगमंच साहाय्य केले. यानंतर नाट्यसेवा थिएटर्सतर्फे ‘अभिप्राय’ हे नाटक सादर झाले.

प्रशांत धात्रक यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन आनंद जाधव यांनी केले. या नाटकात आर्या कोतकर, सौरभ क्षीरसागर, हर्षदीप अहिरराव, आशू चव्हाण, सृजन रत्नपारखी, शरण्या राजपूत, आर्यन पवार, समर्थ लोखंडे, सिया शेळके, कृत्तिका पवार, चंचल माळी या बालकलाकारांनी भूमिका साकारल्या.

हर्षद झोमन यांनी नाटकाचे नेपथ्य तर प्रकाशयोजना कृतार्थ कंसारा यांनी साकारली. ओम देशमुख यांनी नाटकाला संगीत दिले. रवींद्र जाधव यांनी रंगभूषा तर वेशभूषा स्वप्नील नरबडे यांनी साकारल्या.

Drama
Nashik News : दिवंगत महिला जवान गायत्री जाधवांच्या कुटुंबीयांचे छगन भुजबळांकडून सांत्वन

दुपारच्या सत्रात नम्रता कलाविष्कार बहुउद्देशीय संस्था, नाशिकतर्फे ‘झुंजार’ हे नाटक सादर झाले. कल्पेश कुलकर्णी यांनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले. स्नेहा गायकवाड, भार्गव जोशी, वरद अत्रे, देवगंधा भागवत, स्पंदन सुर्ते, स्वरा दोंदे, स्वानंद पाठक, चिन्मय पाठक, सावरी वाघमारे, आरव देशपांडे या बालकलाकारांनी नाटकात अभिनय केला.

नाटकाचे नेपथ्य ह्रषीकेश पाटील यांनी तर चैतन्य गायधनी यांनी प्रकाशयोजना साकारली. जय खोरे यांनी नाटकाला पार्श्‍वसंगीत दिले. माणिक कानडे यांनी रंगभूषा तर नेहा उपाध्याय यांनी वेशभूषा साकारल्या.

यानंतर मनपा शाळा १८ आनंदवली, नाशिकतर्फे ‘पिढीजात’ हे नाटक सादर झाले. सुरेश गोराडे लिखित या नाटकाचे कुंदा बच्छाव यांनी दिग्दर्शन केले. या नाटकात प्रियांका उशिरे, भक्ती भालेराव, विशाल झिने, अविनाश निकाळजे, भाग्यश्री भावसार, अनुजा मल्ले, रिया दाणी, यश शेवाळे, विद्या गवळी, शालू शाह, साक्षी नरवाडे, रंजना गौंड, पूर्वा पोतिंडे, प्रगती तायडे, प्रेम अनारसे या बाल कलाकारांनी भूमिका साकारल्या. वैशाली भामरे यांनी नाटकाचे नेपथ्य तर सुनीता पवार यांनी प्रकाशयोजना साकारली. सुरेखा घुमरे यांनी पात्रांची रंगभूषा साकारली.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Drama
Nashik News : दिंडोरीत आजी- माजी आमदारांनी उघडली कार्यालये; नागरिकांना मात्र हवीय विकासकामे

दुपारच्या सत्रात लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, धुळेतर्फे ‘पडसाद’ हे नाटक सादर झाले. धनंजय सरदेशपांडे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन सुजय भालेराव यांनी केले. जितेंद्र सोनगिरे, जान्हवी डोंगरे, दाक्षायनी नगरराळे, वेदांत बागूल, भावेश बोरसे, राघवेंद्रसिंग कचवाह, ओम बोरसे या बालकलाकारांनी या नाटकात अभिनय केला.

स्वराज सावंत यांनी नाटकाचे नेपथ्य तर राहुल मंगळे यांनी प्रकाशयोजना साकारली. ओम कासार यांनी नाटकाला संगीत दिले. पात्रांच्या रंगभूषा केतकी पंचभाई यांनी वेशभूषा ज्योती मंगळे यांनी साकारल्या. प्रतीक वाघ, हितेश भामरे, शशिकांत नागरे यांनी रंगमंच व्यवस्था हाताळली.

आज नाटक नाही

स्पर्धेत रविवारी (ता. ८) नाटक सादर होणार नाही याची प्रेक्षकांनी नोंद घ्यावी असे आवाहन स्पर्धेच्या समन्वयकांनी केले आहे.

Drama
Dada Bhuse | मालेगाव एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानदानाबरोबरच संस्कृती जोपासण्याचे काम : दादा भुसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com