Raksha Bandhan: स्टेमसेल दान देत भावाला रक्षाबंधनाची भेट! नामको रुग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

Raksha bandhan
Raksha bandhanesakal

Raksha Bandhan : रक्षाबंधनाचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना एका बहिणीने आजाराने त्रस्त भावाला बोनमॅरो (स्टेमसेल्स) दान करत अनोखी भेट दिली.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर नामको हॉस्पिटलमध्ये मज्जारज्जू प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रिया यशस्वी पार पडली. (Raksha Bandhan 2023 gift to brother by donating stem cells Successful transplant surgery at Namco Hospital nashik)

दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेला हा तरुण औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) शाखेत शिक्षण घेत आहे. तीन महिन्यांपासून अधूनमधून थंडी-ताप, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा यासारख्या आरोग्य विषयक तक्रारींनी तो त्रस्त होता.

त्याने ही बाब पालकांना सांगितली. त्यानंतर नामको हॉस्पिटलमधील रक्तविकार तज्ज्ञ डॉ. सिध्देश कलंत्री यांची भेट घेतली. डॉ. कलंत्री यांनी ‘अप्लास्टिक अॅनेमिया’ असल्याचे निदान केले.

हॉस्पिटलमधील अद्ययावत हिमॅटॉलॉजी व बोनमॅरो ट्रान्सप्लांट विभागात डॉ. सिध्देश कलंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्टेमसेल्स (मूलपेशी) दात्याचा शोध सुरू झाला.

त्याच्या दोन्हीही बहिणींनी स्टेमसेल देण्याची तयारी दाखवली मात्र, लहान बहिणीच्या मूलपेशी भावाच्या शरीराशी जुळत असल्याने तिची डोनर म्हणून निश्चिती झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Raksha bandhan
NMC News: सातवा वेतन आयोगाच्या हप्त्यांवर गंडांतर! लेखा विभागाची कसरत

डॉ. कलंत्री आणि हिमॅटोलॉजी विभागातील कुशल परिचारिकांच्या मदतीने बहिणीच्या शरीरातील स्टेमसेल्स तरुणाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपित केले. प्रक्रियेनंतर १० ते १२ दिवसांत तरुणाच्या शरीराने मूलपेशी स्वीकारल्याचे दिसून आले.

पुढील दोन आठवड्यांत रुग्णाच्या विविध तपासण्यांनंतर व रुग्णाची तब्येत स्थिर असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला घरी सोडले.

आपल्या दातृत्वाने भावाचा जीव वाचला हा विचार बहिणीच्या मनात आल्याने तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने हे उपचार झाले.

"आजाराचे निदान झाल्यानंतर कुटुंबासाठी मोठा धक्का होता. मात्र, आजार व अत्याधुनिक उपचारांची माहिती दिल्यानंतर त्यांना धीर वाटला. नामको हॉस्पिटलमधील उच्च तंत्रज्ञान व अद्ययावत सुविधांमुळे बोनमॅरो ट्रान्सप्लांट प्रक्रिया यशस्वी झाली. यापुढेही अधिकाधिक रुग्णांना सुविधांचा लाभ देऊन बरे करण्याचा आमचा प्रयत्न राहील."

- डॉ. सिद्धेश कलंत्री, रक्तविकार तज्ज्ञ

Raksha bandhan
Rain Crop Damage: वर्षभरानंतरही नुकसान भरपाईची प्रतीक्षाच! गत सप्टेंबरमधील नुकसानीच्या 50 कोटींची थकबाकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com