esakal | "पंतप्रधान मोदींची लोकप्रियता सहन न झाल्यानेच कॉंग्रेसचा सीएएला विरोध" 
sakal

बोलून बातमी शोधा

ramdas athwale 1.jpg

आठवले म्हणाले, की डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे स्थान मोठे आहे. आम्ही हिंदू असून, आम्हाला प्रवेश का नाही, या मागणीसाठी हा लढा होता. त्यामुळे या लढ्याचे प्रत्येक आंबेडकरप्रेमींच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. संविधानाने सर्व धर्मीयांना एकत्र राहण्याची शिकवण दिली आहे. इतर देशांतील पीडित भारतीयांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे. मुळात भारत आणि पाकिस्तान हे एकच होते. तेथील अत्याचारित पीडितांना सामावून घेणाऱ्या या कायद्यामुळे भारतीय मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कुठलाही धक्का लागणार नाही.

"पंतप्रधान मोदींची लोकप्रियता सहन न झाल्यानेच कॉंग्रेसचा सीएएला विरोध" 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणलेला नागरिक दुरुस्ती कायदा हा मुस्लिमांच्या अजिबात विरोधात नाही. पंतप्रधान मोदी यांची जगभर वाढती लोकप्रियता कॉंग्रेससह विरोधी पक्षांना सहन होत नसल्यामुळेच नागरिकत्व कायद्याविरोधात रान उठविले जात आहे. नागरिकत्व कायद्यामुळे देशातील मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कुठलाही धक्का लागणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी (ता. 2) येथे केले. श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या वर्धापनानिमित्त ईदगाह मैदानावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)तर्फे झालेल्या अभिवादन सभेत आठवले बोलत होते.

या कायद्यामुळे भारतीय मुस्लिमांच्या नागरिकत्वाला धक्का लागणार नाही
आठवले म्हणाले, की डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे स्थान मोठे आहे. आम्ही हिंदू असून, आम्हाला प्रवेश का नाही, या मागणीसाठी हा लढा होता. त्यामुळे या लढ्याचे प्रत्येक आंबेडकरप्रेमींच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. संविधानाने सर्व धर्मीयांना एकत्र राहण्याची शिकवण दिली आहे. इतर देशांतील पीडित भारतीयांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे. मुळात भारत आणि पाकिस्तान हे एकच होते. तेथील अत्याचारित पीडितांना सामावून घेणाऱ्या या कायद्यामुळे भारतीय मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कुठलाही धक्का लागणार नाही. विरोधकांनी त्याविरोधात राजकारण म्हणून रान उठविले असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारत निकम यांनी सूत्रसंचालन केले. अमोल पगारे यांनी आभार मानले. 

नाशिक रोडला राज्यव्यापी अधिवेशन 
आठवले म्हणाले, की येत्या 17 मेस नाशिक रोडच्या शिखरेवाडी मैदानावर रिपब्लिकन पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. राज्यातील लाखाहून अधिक आंबेडकरप्रेमी कार्यकर्ते या अधिवेशनाला येणार आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींसह अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे अध्यक्षस्थानी होते. काकासाहेब खंबाळकर, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, बाबूराव कदम, ज्येष्ठ नेते प्रियकीर्ती त्रिभुवन, विश्‍वनाथ काळे, फकिरा जगताप, नगरसेविका दीक्षा लोंढे, माजी नगरसेवक संजय भालेराव, पवन क्षीरसागर, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा माधुरी भोळे, अमोल पगारे, भारत निकम, ग्रामीण जिल्हाप्रमुख विनोद जाधव आदींसह विविध भागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा > लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...धक्कादायक घटना!


 

loading image