esakal | "ये मोदी और मेरे अंदर की बात है"
sakal

बोलून बातमी शोधा

ramdas-athvle-modi.jpg

जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तोपर्यंत मला मंत्रिपद आहे. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी आहेत. ये मोदी और मेरे अंदर की बात है, असे गंमतीशीर विधान केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही मोदींना भेटतात. त्यांची लोकप्रियता वाढत आहे, अशा शब्दात आठवलेंनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली.

"ये मोदी और मेरे अंदर की बात है"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तोपर्यंत मला मंत्रिपद आहे. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी आहेत. ये मोदी और मेरे अंदर की बात है, असे गंमतीशीर विधान केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही मोदींना भेटतात. त्यांची लोकप्रियता वाढत आहे, अशा शब्दात आठवलेंनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेत रामदास आठवले बोलत होते.

या लढ्याचे प्रत्येक आंबेडकरप्रेमींच्या दृष्टीने मोठे महत्त्व

आठवले म्हणाले, की डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे स्थान मोठे आहे. आम्ही हिंदू असून, आम्हाला प्रवेश का नाही, या मागणीसाठी हा लढा होता. त्यामुळे या लढ्याचे प्रत्येक आंबेडकरप्रेमींच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. संविधानाने सर्व धर्मीयांना एकत्र राहण्याची शिकवण दिली आहे. इतर देशांतील पीडित भारतीयांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे. मुळात भारत आणि पाकिस्तान हे एकच होते. तेथील अत्याचारित पीडितांना सामावून घेणाऱ्या या कायद्यामुळे भारतीय मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कुठलाही धक्का लागणार नाही. विरोधकांनी त्याविरोधात राजकारण म्हणून रान उठविले असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

काँग्रेसवर टीकास्त्र

विरोधी पक्षातील नेत्यांचा तोल गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते विरोध करतात असं म्हणत आठवलेंनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. CAA बाबत मुस्लिम समाजातील नागरिकांना काही अडचण असेल, तर मी त्यांच्या पाठीमागे उभा राहीन, अशी भूमिकाही आठवलेंनी घेतली आहे.

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यास रिपाइंचा विरोध

दरम्यान, शिवसेनेपाठोपाठ मनसे आणि भाजपनेही ‘औरंगाबाद’ शहराचे ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्याचा आग्रह धरला असतानाच भाजपच्या मित्रपक्षाचा मात्र विरोधाचा सूर आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्यास रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला होता.औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यास रिपाइंचा विरोध आहे. कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये, असे पक्षाला वाटतं, असं रामदास आठवले रविवारी म्हणाले होते. एकीकडे नरेंद्र मोदींचे गोडवे आठवले गात असतानाच राज्यातील भाजपच्या भूमिकेला मात्र त्यांनी विरोध दर्शवल्याचं चित्र आहे. 

हेही वाचा > लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...धक्कादायक घटना!

loading image