YCMOU News : नवीन शैक्षणिक धोरणात मुक्‍त विद्यापीठाला संधी : रमेश बैस

Chancellor of Yashwantrao Chavan Maharashtra Open University and Governor Ramesh Bais felicitated by Vice-Chancellor Dr. Sanjeev Sonwane
Chancellor of Yashwantrao Chavan Maharashtra Open University and Governor Ramesh Bais felicitated by Vice-Chancellor Dr. Sanjeev Sonwaneesakal

YCMOU News : विद्यार्थ्याला सक्षम आणि स्वयंपूर्ण बनविण्याची क्षमता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे.

शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे आपले ब्रीद अधिक प्रभावीपणाने राबवू शकेल, असा विश्‍वास कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी व्‍यक्‍त केला. (Ramesh Bais statement Opportunity for YCMOU in New Education Policy Nashik)

मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी राजभवनात घेतलेल्या सदिच्छा भेटीत राज्यपाल श्री. बैस यांनी विद्यापीठाची वाटचाल आणि भविष्यातील योजनांबाबत माहिती घेतली. यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी राज्यपालांची भेट घेतांना त्यांचा विद्यापीठातर्फे सत्कार केला. मुक्त विद्यापीठाची कार्यप्रणाली, हेतू, उद्दिष्ट्ये तसेच आजवरची वाटचालीबाबत प्रा. सोनवणे यांनी संवाद साधला.

स्थापनेपासून आजपर्यंत पंच्याहत्तर लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुक्त विद्यापीठ वाटचालीबाबत राज्‍यपाल बैस यांनी समाधान व्‍यक्‍त केले. ते म्‍हणाले, की पारंपरिक विद्यापीठापेक्षा वेगळी वाट निवडणाऱ्या मुक्त विद्यापीठापुढे आगामी काळातील आधुनिक शिक्षणप्रणालीचे मोठे आव्हान आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chancellor of Yashwantrao Chavan Maharashtra Open University and Governor Ramesh Bais felicitated by Vice-Chancellor Dr. Sanjeev Sonwane
Nashik ZP News: स्वयंसेवी संस्थांसाठी खुली झाली जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची दालने

कौशल्य विकासावर भर देणाऱ्या अभ्यासक्रमांची व्याप्ती अधिक वाढवत नेऊन तळागाळापर्यंत पोहोचताना आपला विद्यार्थी वैश्‍विक पातळीवरील आव्हानांना सामोरे जाऊ शकेल, यापद्धतीने ध्येय धोरणांची आखणी, अंमलबजावणी करावी. देशभरातील तज्‍ज्ञांचे विद्यापीठ कामकाजात मार्गदर्शन घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाची मूर्ती भेट देवून त्यांचा सत्कार केला. विद्यापीठ येत्या पाच वर्षात शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करेल, अशी ग्वाही यावेळी त्‍यांनी दिली.

Chancellor of Yashwantrao Chavan Maharashtra Open University and Governor Ramesh Bais felicitated by Vice-Chancellor Dr. Sanjeev Sonwane
Water Crisis: मॉन्सूनच्या विलंबामुळे टंचाईच्या झळा बळावल्या; राज्यात 66 गावे अन 119 वाड्यांसाठी 31 टँकरची वाढ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com