Nashik Ramtirth News : रामतिर्थाच्या सौंदर्यात रंगरंगोटीची भर; सीएसआर फंडातून NMCचा स्तुत्य उपक्रम

Ramtirth News
Ramtirth Newsesakal

Nashik Ramtirth News : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत नाशिक महापालिकेला उच्च नामांकन मिळविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

विविध संस्थांच्या माध्यमातून उभारलेल्या सीएसआर फंडातून मनपाच्या सहाही विभागात वॉल पेटिंग्जद्वारे शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंचवटीतील रामतीर्थावर वॉल पेटिंग्जद्वारे काढण्यात आलेल्या आकर्षक चित्रामुळे रामतीर्थाला झळाळी प्राप्त झाली आहे. (Latest Nashik News)

भाविकांनी गजबजलेले रामतीर्थ
भाविकांनी गजबजलेले रामतीर्थesakal
रामतीर्थावरील परिसरात रंगरंगोटी करताना चित्रकार
रामतीर्थावरील परिसरात रंगरंगोटी करताना चित्रकारesakal

केंद्र सरकारच्या अमृतसिटी योजनेत नाशिकचा समावेश झाला आहे. त्या दृष्टीने केंद्रीय शिष्टमंडळ लवकरच शहरात येत असल्याने प्रशासनाची तयारी सुरू आहे. शहराच्या सुशोभीकरणांतर्गत महापालिकेच्या सहाही विभागात स्वच्छता अभियानासह विविध विकासकामे सुरू आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून मनपाच्या नाशिक पूर्व, पश्‍चिम, मध्य, पंचवटी, सातपूर व नाशिक रोड या सहाही विभागातील सार्वजनिक जागा, भिंती स्वच्छ करण्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे.

त्यात पर्यटनस्थळांसह सार्वजनिक ठिकाणांच्या सुशोभीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. रामतीर्थावरील वस्त्रांतरगृहाच्या भिंती, गांधी स्मारक, लक्ष्मण तीर्थावर सिंहस्थात उभारण्यात आलेला छोटा पूल, पंचवटीतील विविध देवस्थाने यांच्या भिंतींवर देवदेवतांसह नाशिकचा प्राचीन इतिहास कथन केला जाणार आहे.

या कामामुळे रामतीर्थाला झळाळी प्राप्त झाली असून, स्थानिकांसह पर्यटकांनीही सौंदर्यीकरण वाढविणाऱ्या या कामाचे कौतुक केले आहे.

कलाकारांनी आपल्या कलेचे उत्तम सादरीकरण रामतीर्थावर केल्याचे दिसून येत आहे.
कलाकारांनी आपल्या कलेचे उत्तम सादरीकरण रामतीर्थावर केल्याचे दिसून येत आहे.esakal
Ramtirth News
Nashik Ramtirth Update : रामतीर्थाचा कोंडलेला श्‍वास मोकळा व्हावा
रामतीर्थावरील परिसरात रंगरंगोटी करताना चित्रकार
रामतीर्थावरील परिसरात रंगरंगोटी करताना चित्रकारesakal
Summary

या संस्था आहेत सहभागी

सौंदर्यीकरणाचे हे काम विविध आस्थापनांनी उपलब्ध करून दिलेल्या सीएसआर फंडातील निधीद्वारे सुरू आहे. यासाठी वॉटरग्रेस, तनिष्का सर्व्हिसेस, सय्यद असफअली एन्टरप्रायजेस, एव्ही एनव्हायरो इन्फ्रास्ट्रक्चर आदी आस्थापनांनी या सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.

रामतीर्थाचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याने या ठिकाणी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून भाविक पर्यटकांची बारमाही गर्दी असते. या भाविकांना शहराची ओळख रामतीर्थावरूनच होते, त्यामुळे रामतीर्थ परिसर स्वच्छ व चकचकीत ठेवण्याचे मनपा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

त्यातच गोदेच्या महाआरतीसाठी राज्य सरकारने भरीव निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आगामी काळात रामतीर्थाला वेगळी ओळख मिळवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

"विविध आस्थापनांनी उपलब्ध करून दिलेल्या फंडातून शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम सुरू आहे."

- डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com