Nashik News : इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात फुलला दुर्मिळ, वनौषधींचा मळा; मनमोहक सुगंधाने दरवळतोयं आसमंत

rare flower in Igatpuri Trimbakeshwar taluka herb garden nashik news
rare flower in Igatpuri Trimbakeshwar taluka herb garden nashik news

Nashik News : इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात झालेल्या पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा अक्षरशः हिरवाईने नटल्या आहेत. डोंगररांगेत विविध औषधी व रानफुले बहरली आहेत. त्यांच्या मनमोहक सुगंध दरवळत आहे. रानफुले, वनस्पती व वनौषधी बघण्यासाठी व सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यासाठी येथे अभ्यासक व पर्यटकांची गर्दी होत आहे. (rare flower in Igatpuri Trimbakeshwar taluka herb garden nashik news)

गडकिल्ल्याची ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेल्या इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील निसर्ग सर्वश्रूत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पर्जन्यमान बिघडल्यामळे काही वनस्पती व दुर्मिळ औषधी लुप्त होत चालल्या होत्या. यंदा मात्र पावसामुळे रानफुलांसह औषधी वनस्पतींचा जणू काही खजिनाच उदयास आला आहे.

गावठी वनस्पती व वनऔषधींमध्ये तिरडा, हिरडा, बेहडा, बेल, फालगम अजनी, भुरणी यांचा समावेश आहे, तर फुलांच्या प्रजातीमध्ये लॅमिअँसी कुळातील रानतुळसही येथे पाहायला मिळत आहे. लिलीअँसी व अस्कलेपिडॅसी कुळातील ग्लोरीअसा सिरोपेजिया, बार्बाटस, कोमेलिना, सुपर्बा फुले असणारी अतिशय मनमोहक फुले व वनस्पती येथे बघायला मिळत आहे.

rare flower in Igatpuri Trimbakeshwar taluka herb garden nashik news
Nashik MD Drug Case : माजी महापौर पांडेंची आज चौकशी; एमडी ड्रग्ज कनेक्शनवरून पोलिसांकडून पाचारण

सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या देवतेरडा, जंगली लॅव्हेडंर, गोकर्णा, पिवळी तिळवण, मेनमुळ, हिरेशिर, कानवेल, सागकी, वासुकी, अम्बुशी, केना पानवेल, देवकेवडा, तिलोनी, हमाना, रानझेनिया सोनकी आदी रानफुलांचा समावेश आहे.

दुर्मिळ वनस्पतींच्या जतनासाठी पुढाकार गरजेचा

केंद्र शासनाने नव्याने तयार केलेल्या आयुष विभागाच्या मंत्रालय व पर्यटन विभागाने याबाबतीत इगतपुरी त्र्यंबकमधील दुर्मिळ वनस्पती, वनऔषधी व रानफुले जतन करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. वनस्पतीशास्त्र, निसर्गप्रेमी व अभ्यासकांसाठी ते उपयुक्त ठरणार आहे.

rare flower in Igatpuri Trimbakeshwar taluka herb garden nashik news
NMC Election News : आधी लोकसभा, मगच महापालिका निवडणुका; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com