esakal | Mahashivratri 2020 : म्हणून.. त्र्यंबकेश्‍वरला गर्भागृहात प्रवेश बंदी..!
sakal

बोलून बातमी शोधा

trimbak 4.jpg

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्‍वरला अलोट गर्दी बघायला मिळाले. परराज्यातून आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. "बम.. बम.. भोले'चा गजर करतांना भाविकांनी भगवान शंकराची आराधना केली. उपस्थितांमध्ये महिला, युवकांची संख्या लक्षणीय होती. मंदिर परीसरातील फुलांनी केलेली आकर्षक सजावट भाविकांच्या आकक्षणाचा केंद्र ठरत होती.

Mahashivratri 2020 : म्हणून.. त्र्यंबकेश्‍वरला गर्भागृहात प्रवेश बंदी..!

sakal_logo
By
अरूण मलाणी / केशव मते : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त त्र्यंबकराजाच्या दर्शनाला पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दर्शनासाठी उपस्थित झालेल्या भाविकांनी मंदिर परीसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातील विविध राज्यातून भाविक दर्शनासाठी आले होते. पण भाविकांच्या सुरक्षिततेसाठी यंदा प्रथमच ट्रस्टतर्फे भाविकांना गर्भागृहात प्रवेश बंद ठेवण्यात आला.

परराज्यातून आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्‍वरला अलोट गर्दी बघायला मिळाले. परराज्यातून आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. "बम.. बम.. भोले'चा गजर करतांना भाविकांनी भगवान शंकराची आराधना केली. उपस्थितांमध्ये महिला, युवकांची संख्या लक्षणीय होती. मंदिर परीसरातील फुलांनी केलेली आकर्षक सजावट भाविकांच्या आकक्षणाचा केंद्र ठरत होती. तसेच आपलेल्या भाविकांसाठी विविध सामाजिक संस्थांकडून प्रसाद वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त महामंडळातर्फे भाविकांच्या सोयीसाठी जादा बसगाड्यांची व्यवस्था केली होती.

ट्रस्टच्या अध्यक्षांनी "सकाळ" ला सांगितले कारण...

त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुधेश बोधणकर यांनी "सकाळ'शी संवाद साधतांना सांगितले की, दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांपैकी मोठ्या प्रमाणावर भाविक गर्भागृहात दर्शनासाठी जायचे. जास्त गर्दी झाल्याने श्‍वास कोंडण्याची भिती लक्षात घेता, यावर्षी पहाटे चार ते सातपर्यंतचे गर्भागृह दर्शनासाठी बंद ठेवले होते. या निर्णयामुळे नियमित भाविकांची सोय झाली. तसेच दर्शनाचा वेळ वाढविण्याने सर्वांना व्यवस्थितरित्या दर्शन घेता आले. नेहमीप्रमाणे यंदाही दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली असतांना, कुठलीही दुर्घटना घडली नाही. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्‍त सुरक्षारक्षक तैणात केलेले होते. तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

हेही वाचा > धक्कादायक! 'या' तंत्रज्ञानामुळे फेकन्यूज ओळखणंही होणार अवघड..कारण..

हेही वाचा >....ही बाब समजताच "शिवप्रेमी' भडकले..वातावरण चिघळले..