esakal | नाशिक : निफाडमध्ये रेकॉर्ड ब्रेक लसीकरण! 2 लाख नागरिक लसवंत
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

नाशिक : निफाडमध्ये रेकॉर्ड ब्रेक लसीकरण! 2 लाख नागरिक लसवंत

sakal_logo
By
दिपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट (Hotspot) बनलेल्या निफाड तालुक्यात कोविशिल्डचे (Covishield) रेकार्ड ब्रेक लसीकरण (Vaccination) झाले आहे. आठवड्यात 45 सत्रामध्ये साठ हजार नागरिकांनी लस घेतली. तब्बल दोन लाख नागरिक आत्तापर्यंत लस घेऊन संरक्षित झाले आहेत. लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्याने जम्बो लसीकरण सत्र सुरू आहेत. नागरिकही लस घेण्यासाठी उस्फूर्तपणे पुढे येत आहे.

आता नागरिकांनी पुढे यावे...

लसीच्या तुटवड्यामुळे नागरिक आरोग्य यंत्रणेच्या नावाने ओरड करीत होते. आता लस मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने नागरिकांनी मनात कोणतीही भिती न ठेवता लसीकरणांसाठी पुढे येण्याची गरज आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरण हे कवच कुंडल ठरणार आहे.

हेही वाचा: NEET : नीट परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध

आरोग्य कर्मचारी करताहेत जनजागृती

अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे कासवगतीने लसीकरण सुरू होते. नागरिकाची मोठी ओरड व्हायची. आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी याची दखल घेत लस उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला. गेल्या आठवड्यापासून 60 हजार लसीचा साठा उपलब्ध होऊ लागला आहे. लसीकरण सत्राबाबत आरोग्य यंत्रणेची बैठक घेऊन नियोजन केले. अठरा वर्षावरील तरुणांची मोठी गर्दी लसीकरण केंद्रांवर दिसू लागली आहे. गैरसमज दूर करण्यासाठी आरोग्य कर्मचारी जनजागृती करीत आहेत.

आकडे बोलतात....

कोविशिल्ड लसीकरण स्थिती
वयोगट 18 ते 44 वर्षे- वयोगट 45 ते 59 वर्षे वयोगट 60 वर्षे वरील
एकूण लोकसंख्या-2 लाख 41 हजार 697 1 लाख 32 हजार 358 51 हजार 792 4 लाख 25 हजार 847
लसीकरण झालेली लोकसंख्या- 89 हजार 682, 65 हजार 475 , 46 हजार 833 2 लाख 1 हजार 990

हेही वाचा: इगतपुरीत लंपी त्वचारोगाचे थैमान; हजारो जनावरे बाधित

नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे

''कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निफाड तालुक्यात मनुष्य व आर्थिक हानी सर्वाधिक झाली. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता कोविशिल्ड लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. पुरेसा लससाठा आरोग्य विभागाला मिळाला आहे. नागरिकांनी मनात भिती न ठेवता लसीकरणासाठी पुढे यावे.'' - दिलीप बनकर,आमदार ,निफाड.

''आवश्‍यक प्रमाणात आता लस उपलब्ध होऊ लागल्याने लसीकरण सत्रांची संख्या व डोस वाढविण्यात आले आहे. निफाड तालुक्यात अठरा वर्षावरील दोन लाख नागरिकांना आतापर्यत लस देण्यात आली आहे. लवकरच उर्वरित नागरिकांना लस देऊन संरक्षित केले जाणार आहे.'' - डॉ. चेतन काळे, तालुका नोडल अधिकारी, निफाड.

loading image
go to top