esakal | नाशिक : वालदेवीत बुडालेल्याचा 24 तासांपासून शोध सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

rescue

नाशिक : वालदेवीत बुडालेल्याचा 24 तासांपासून शोध सुरूच

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांचा प्रवाह वाढला आहे. दारणा, गोदावरीसह वालदेवीचे पाणी वाढले आहे. दरम्यान दाढेगाव शिवारात सायंकाळी उशिरा एकजण नदीत वाहून गेला. आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे २४ तासांपासून त्याचा शोध सुरू आहे. वसंत लक्ष्मण गांगुर्डे (वय ४५) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा: सणासुदीत गॅस सिलिंडर दरवाढीने अर्थकारण बिघडले

२४ तासांपासून शोध सुरूच

पिंपळगाव खांब परिसरातील गांगुर्डे शनिवारी (ता. ११) वाहून गेले. दाढेगावला शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एकजण वाहून गेल्याचा कॉल आल्यापासून त्याचा शोध सुरू आहे. वाहून गेलेला व्यक्तीचा आपत्ती व्यवस्थान पथकाने शनिवारी शोध घेतला. रविवारी (ता. १२) सकाळी साडेसातला शोधकार्य सुरू झाले. दुपारी तीनपर्यंत ते सुरू होते. यात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अर्जुन कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश केदारे, प्रवीण काळे, विशाल चौधरी, भगवान पंडित, मयूर दंडाईत, साहील मोरे, रितेश टोकरे, अजय बोराडे, सचिन साळवे आदींसह अग्निशमन दलाचे जवानही सहभागी झाले आहेत.

हेही वाचा: भंडारदरा ओव्हरफ्लो! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

loading image
go to top