esakal | फाइल अडवून ठेवणाऱ्यांची वेतनवाढ थांबवा; झेडपीच्या सभेत ठराव
sakal

बोलून बातमी शोधा

zp nashik.

फाइल अडवून ठेवणाऱ्यांची वेतनवाढ थांबवा; झेडपीच्या सभेत ठराव

sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : जिल्हा परिषदेत विकासकामांच्या मंजूर फायली अडवून ठेवणारे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर वचक बसवा म्हणून अशांची यापुढे एक वेतनवाढ थांबवावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला.


तब्बल दीड वर्षांनंतर बुधवारी (ता. ८) जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. सभेत ८० टक्क्यांहून अधिक सदस्यांनी हजेरी लावत सभागृहात आपल्या समस्यांना वाट मोकळी करून दिली. डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी अधिकारी व कर्मचारी मुद्दाम फाइल अडवित असल्याचा आरोप केला. अनेक विकासकामे वर्षभरापूर्वी मंजूर होऊनही केवळ ठेकेदार येऊन भेटत नसल्याने त्या फाइल अडवून ठेवतात. ठेकेदार भेटल्यानंतर कामांना वेग येतो. याला आळा बसावा म्हणून संबंधितांची एक वर्षाची वेतनवाढ रोखली जावी, असा ठराव मांडला. मागील सात वर्षांपासून माझ्या गटातील दोन फाइल मी शोधत असल्याचे सदस्य भास्कर गावित यांनी सांगितले. यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी पुढील दोन दिवसांमध्ये फाइल प्रलंबित ठेवणे, वर्कऑर्डर दिल्या गेल्या नाही, अशा सर्व कामांची माहिती घेऊन ही सर्व प्रकरणे मार्गी लावली जातील, असे आश्‍वासन दिले. विविध विषयांवर झालेल्या चर्चेत सर्वच सदस्यांनी सहभाग घेतला. उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती संजय बनकर, आर्कि. अश्‍विनी आहेर, सुशीला मेंगाळ, सदस्य, गटनेते, विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : जुळ्या चिमुकल्यांसह खाणीत आढळला बेपत्ता पित्याचा मृतदेह


सदस्य- सभापतींमध्ये बाचाबाची

सभेत सदस्यांनी प्रश्‍न मांडण्यास सुरवात केली. हायमस्ट पथदीपाचे थकलेले वीजबिल, दुरुस्तीवर चर्चा झाली. येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी महावितरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. सदस्य उदय जाधव यांनी प्रवीण गायकवाड यांना थांबवूत पुढील विषयांवर चर्चा करण्यास सांगितल्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. प्रवीण गायकवाड यांनी आम्ही सभागृहाचे सदस्य राहिलो असून, आम्हाला सभागृहाचे काम शिकवू नये, असे सांगितले.

सभागृहातील ठळक बाबी

- हायमस्टला कुठल्याच योजनेतून परवानगी देऊ नये
- ग्रामपंचायतींनी हद्दीतील महावितरणास दिलेल्या जागांवर कर आकारणी करावी
- कोरोनामुळे सदस्यांच्या मुदतीला किमान दोन वर्ष वाढ द्यावी
- नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे तत्काळ नुकसान निधी द्या
- १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे पुढील आठ दिवसांत नियोजनाची सूचना
- ग्रामपंचायत स्तरावरील निविदाप्रक्रियेत मोठा गैरव्यवहाराचा उदय जाधव यांचा आरोप
- वडाळाभोई प्राथमिक आरोग्य केंद्राचा दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित करताना सदस्या कविता धाकराव भावुक
- निर्लेखन, अनामत रक्कम, विकासकामे यांसारख्या १२० विषयांना मंजुरी

हेही वाचा: नाशिक महापालिकेने 348 गणेश मंडळांना परवानगी नाकारली

loading image
go to top