

मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर पत्नीसोबत उर्वरित आयुष्य निवातं जगायचं होतं. पण सुखी संसाराला आजाराची दृष्ट लागली. बरं वाटावं म्हणून बरेच उपचार झाले. निवृत्तीवेतनाचे पैसेही खर्च झाले. तरी आजार कमी होईना. तिची आजारपणातून सुटका करतोय म्हणत सेवानिवृत्त पतीने हत्या केली आणि स्वत:ही आत्महत्या केली. नाशिकच्या सावरकरनगरमध्ये मुरलीधर जोशी यांनी पत्नीची हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत जीवन संपवलं. आत्महत्येआधी त्यांनी चिठ्ठीही लिहून ठेवली होती.