

Chhagan Bhujbal : मागील वर्षी शहरात पावसाचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे पुराची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. तालुक्यात पाण्याची टंचाई अधिक असून अलनिनोचा प्रभाव लक्षात घेऊन जुलैअखेरपर्यंत पाणीपुरवठा होईल यासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा.
कुठल्याही परिस्थितीत पिण्याच्या तक्रार प्राप्त होता कामा नये अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. (Review of Development Works Mini Ministry works inspected by chhagan bhujbal at yeola nashik)
श्री. भुजबळ यांनी आज येथील प्रशासकीय संकुलाची पाहणी करीत विविध विकासकामांचा आढावा घेतला, त्यावेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी किरण देशमुख, उपविभागीय कार्यकारी अभियंता अभिजीत शेलार, सहायक अभियंता सागर चौधरी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी, गटविकास अधिकारी अन्सार शेख, तालुका पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, शहर पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले की, नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे पडलेले विजेचे खांब तातडीने उभे करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. शहरातील नैसर्गिक नाल्यांचा अडथळा दूर करण्यात येऊन नाल्यावर कुठेही अनधिकृत बांधकाम होऊ नये याची दक्षता घ्यावी. यावर्षी पुराची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून तातडीने उपाययोजना करा.
शहर वाढीव पाणीपुरवठा योजना प्रस्तावाची सद्यस्थिती, नगरपरिषदेच्या कोपरगाव तालुक्यातील तलाव, शहरातील स्वच्छता, शहर पावसाळापूर्व कामे, ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, तलावातील पाण्याची स्थिती,
येवला व ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशन मधील रेट्रोफिटिंग योजनेच्या कामे, राजापूर व ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना, रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
खरीप हंगामासाठी खते बी-बियाणे उपलब्धता पीक कर्ज, जिल्हा बँकेचे उद्दिष्ट व कर्जवाटप, पीक विमा योजना भरपाईसह अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांच्या मदतीचा आढावा घेतला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
प्रशासकीय संकुलाची केली पाहणी
भुजबळांच्या हस्ते आज प्रशासकीय संकुलात टप्पा २ अंतर्गत इतर प्रशासकीय कार्यालय, उपाहार गृह, परिसरातील सौंदर्यीकरण कामे व लहान मुलांसाठी खेळणीसह मैदान या विविध विकास कामांचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे मिनी मंत्रालयातील तहसील, प्रांताधिकारी, पंचायत समिती, पोलिस स्टेशन आदी कार्यालयाची वेळ काढत भुजबळांनी पायी फिरून पाहणी केली.
पुरणगावला वर्ग खोल्यांचे भूमिपूजन
श्री. भुजबळ यांच्या हस्ते पुरणगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले. मकरंद सोनवणे, किशोर ठोंबरे, विश्वास आहेर, वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, नितीन गायकवाड, बाळासाहेब गुंड, गोरख काळे, गणपत कांदळकर, देविदास शेळके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.