NMC River Cleaning : महापालिकेकडून नदी स्वच्छता मोहीम; 300 किलो कचरा संकलित

Volunteer during river cleaning campaign in the area
Volunteer during river cleaning campaign in the areaesakal

NMC River Cleaning : पर्यावरण दिनानिमित्त महापालिका व शहरातील स्वयंसेवी संस्था जेसीआय ग्रेपसिटी व पु. ना. गाडगीळ ॲन्ड सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या उपक्रमांतर्गत शहरातील तपोवन परिसरातील गोदावरी नदीच्या काठावरील प्लॅस्टिक कचऱ्यासह नदीपात्रात वाहून आलेला सुमारे ३०० किलो कचरा संकलित करून विल्हेवाटीसाठी घंटागाडीद्वारे खतप्रकल्पावर पाठविण्यात आला.

या वेळी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची व पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. (River Cleaning Campaign by NMC 300 kg of garbage collected nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Volunteer during river cleaning campaign in the area
NMC News : महापालिका आयुक्तपदी कोणाची नियुक्ती?

वाढते प्रदूषण व प्लॅस्टिकचा कचरा यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. प्लॅस्टिक कचऱ्याचे विघटन होत नसल्याने जागतिक समस्या निर्माण झाली आहे. प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करणे किंवा वापरणे पूर्णपणे बंद करणे, ही काळाची गरज बनली आहे.

त्याचबरोबरीने वाढते नदी प्रदूषणदेखील चिंतेचे कारण बनत असून या सर्व घटकांचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, उपायुक्त तथा गोदावरी संवर्धन कक्ष प्रमुख डॉ. विजयकुमार मुंडे, जेसीआय ग्रेपसिटीचे महेश दीक्षित, सुनील रोकडे, पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांचे अधिकारी व कर्मचारी तसेच मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि वॉटरग्रेस सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Volunteer during river cleaning campaign in the area
NMC News: होर्डिंगवर जिओ टॅगिंग लावण्याचा निर्णय; 150 होर्डिंगधारकांकडून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com