Nashik News: पहिल्याच पावसामध्ये रस्त्यांची झाली गटार; ग्रामपंचायतीच्या आरोग्यसेवेचा कारभार चव्हाट्यावर

file photo
file photoesakal
Updated on

Nashik News : वणी येथे ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वीचे आवश्यक असलेली गटारींची साफसफाई न केल्याने पहिल्याच मान्सूनपूर्व पावसाने गटारीतल पाणी व कचरा गावातील बाजारपेठेतील रस्त्यावर आला.

ग्रामपंचायतीच्या आरोग्यसेवेचा कारभार चव्हाट्यावर आला असून भूमिगत गटारीचेही केलेले काम नियोजनानुसार न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. (Roads got waterlogged in first rain Gram Panchayat health care exposed Nashik News)

वणी व परीसरात रविवारी (ता.४) दुपारी बाराच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. महाराणा प्रताप चौक भागातून गटारीतून आलेले पाणी व कचरा गावातील मध्यवर्ती व बाजारपेठ असलेल्या रस्ता तसेच शिवाजी रोड, जैन मंदिर रस्तावरुन वाहत होता.

रस्त्यालाच गटारीचे स्वरुप प्राप्त झाले होते. गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली होती. येथील जुन्या भाजी मंडईपासून देवी मंदिर चौकापर्यंत रस्त्याच्या एका बाजूने ग्रामपंचायतीने प्रथमच भूमिगत गटारीचे काम हाती घेतले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

file photo
Nashik News: अल्पसंख्याक विभाग संलग्न अधिकाऱ्यांचे वेतन रखडले!

मात्र ते करताना परिसरातील रहिवाशांना विश्वासात न घेता तसेच सदोष पध्दतीने भूमिगत गटाराचे काम वरखाली झाल्याचा तसेच बांधलेले चेंबर रस्त्यावर आल्याने रस्त्यावरील पावसाचे पाणी भूमिगत गटारीत जावू शकत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी व ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी गटारी, नालेसफाईचे कामे पूर्ण करावे अन्यथा घाण व कचऱ्यांने गटारी जागोजागी तुंबल्याचे चित्र पाहयाल मिळेल असे ग्रामस्थांनी म्हटले आहे

file photo
NCP Agitation: मनपा आयुक्तांच्या नामफलकाला फासले काळे! मालेगावला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.