गिरणा नदीला आवर्तन द्या; दीपिका चव्हाण यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

गिरणा नदी
गिरणा नदीesakal

सटाणा : गिरणा नदीपात्रालगत पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या सटाणा शहरासह कळवण, मालेगाव तसेच गिरणा नदीवर असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा उद्‌भव आटल्याने या तीनही तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तर शेती सिंचनाचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. आगामी चैत्रोत्सव व इतर सणांच्या पार्श्‍भूमीवर या टंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर किंवा पुनंद धरणातून गिरणा नदीपात्रात आवर्तन सोडावे, अशी आग्रही मागणी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे गुरुवारी (ता. ७) निवेदनाद्वारे केली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्‍यांनी येत्या रविवारी (ता. १०) गिरणा नदीपात्रात पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या ४२ ते ४३ अंश सेल्सिअस तापमान असल्याने सटाणा, कळवण, मालेगाव तसेच गिरणा नदीवर (Girna River) असलेल्या सर्वच सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा उद्‌भव आटला आहे. त्यामुळे सर्वत्र पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, सिंचनाचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. सटाणा पालिका प्रशासनाकडून शहरात सध्या तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍या गिरणा नदीपात्रात पाणी आले नाही तर नाइलाजाने पाच ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर येऊ शकते.

गिरणा नदी
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई: तातडीने पाण्याचे टॅंकर रवाना-आदित्य ठाकरे

टंचाईमुळे महिला भगिनींना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिकांना टॅंकरने विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. उच्च तापमानाच्या झळा मुक्या जनावरांना बसत आहे. येत्या काही दिवसात सप्तश्रृंगडावरील चैत्रोत्सवाची यात्रा सुरू होत आहे. यात्रोत्सवासाठी धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशातून लाखो भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे. परंतु, पाणीटंचाई (water scarcity) असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे. मुस्लिम धर्मियांचा पवित्र रामजाण सण सुद्धा सुरू आहे. मात्र, टंचाईमुळे सण- उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे तातडीने चणकापूर किंवा पुनंद धरणातून गिरणा नदीपात्रात आवर्तन सोडून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही श्रीमती चव्हाण यांनी केली आहे.

गिरणा नदी
सटाण्याच्या माजी नगराध्यक्षांवर सनसनाटी आरोप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com