नाशिक : वीज पुरवठा खंडित असलेल्या ६० हजार ग्राहकांना नोटिस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL

नाशिक : वीज पुरवठा खंडित असलेल्या ६० हजार ग्राहकांना नोटिस

नाशिकरोड : कायमस्वरूपी वीजपुरवठा (Power Supply) खंडित असलेल्या महावितरणच्या (MSEDCL) नाशिक, मालेगाव आणि अहमदनगर मंडळातील अशा एकूण ६० हजार १३३ ग्राहकांना जिल्हा व तालुका विधी सेवा प्राधिकरण यांचे माध्यमातून नोटीस देण्यात आल्या असून आज शनिवार ७ मे २०२२ रोजी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय महालोकअदालत मध्ये तडजोडीच्या माध्यमातून व विलासराव देशमुख अभय योजनेअंतर्गत सहभाग घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. (Notice to 60,000 customers whose power supply has been cut off Nashik MSEDCL News)

हेही वाचा: नाशिक : मालेगावात 3 दुकानांना आग; लाखोंचे नुकसान

थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील थकबाकी वसूलीसोबतच ग्राहकांना लाभ व सवलत मिळेल या हेतूने विलासराव देशमुख अभय योजना जाहीर केलेली आहे. सदर योजनेअंतर्गत थकबाकी असणाऱ्या व त्यामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडील थकबाकीचा भरणा करून सवलतीसोबतच पुनर्रजोडणीची संधी मिळणार आहे. या योजनेत थकबाकीदार ग्राहकांना थकबाकीची मूळ रक्कम भरावी लागेल, त्यामुळे त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १००% माफ करण्यात येइल. जर थकबाकीदार ग्राहकांनी मुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५% व लघुदाब ग्राहकांना १०% थकीत मुद्दल रकमेत अधिकची सवलत मिळेल. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून तसेच या योजनेचा लाभ संबंधित ग्राहकांनी घेऊन थकबाकीमुक्त व्हावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

हेही वाचा: इंधन, गॅसचा वाढता आकडा, सोसवेना महागाईचा भडका..!

Web Title: Notice To 60000 Customers Whose Power Supply Has Been Cut Off Nashik Msedcl News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top