Nashik News: बंदच्या अफवेने पेट्रोलपंपावर गर्दी! सोशल मीडियावर मेसेज व्हायरल; प्रशासनासह विक्रेत्यांकडून बंदचा नकार

अशा प्रकारचा कुठलाही बंद नसल्याचे पेट्रोलपंप असोसिएशन व जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Petrol Supply
Petrol Supplyesakal

नाशिक : इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांचा मंगळवार (ता. ९)पासून संप पुकारल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरातील पेट्रोलपंपांवर सोमवारी सायंकाळी गर्दी झाल्याचे दिसून आले.

मात्र, अशा प्रकारचा कुठलाही बंद नसल्याचे पेट्रोलपंप असोसिएशन व जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Rumors of closure crowd at petrol pump Message goes viral on social media Refusal of closure by vendors including administration Nashik News)

Petrol Supply
Nashik Crime: अन् पठ्ठ्यानं चक्क पोलिस चौकीसमोरच केली चोरी!

जिल्ह्यातील वाहतूकदारांनी गेल्या आठवड्यात अचानकपणे बंद पुकारल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. हा अनुभव गाठीशी असल्याने सोमवारी आलेल्या मेसेजमुळे अनेकांनी सावधगिरीचा उपाय म्हणून पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली.

एक लिटरऐवजी जास्तीत जास्त पेट्रोल भरल्यामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, कुठल्याही प्रकारचा बंद नसल्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. पुरवठा नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पेट्रोलपंप असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

"चुकीचा मेसेज व्हायरल झाल्याने पेट्रोलपंपांवर गर्दी होत आहे. पण कुठल्याही प्रकारे बंद नाही. चालकांनी बंद पुकारल्यास त्यांनी तशी पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. पण अशा प्रकारचे काहीच कळविण्यात आलेले नाही."

-भूषण भोसले, अध्यक्ष, पेट्रोलपंप डीलर असोसिएशन, नाशिक

Petrol Supply
Radhakrishna Vikhe Patil: मविप्रने जपला बहुजन समाजाच्‍या उत्‍कर्षाचा वारसा : मंत्री विखे-पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com