Radhakrishna Vikhe Patil: मविप्रने जपला बहुजन समाजाच्‍या उत्‍कर्षाचा वारसा : मंत्री विखे-पाटील

मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही बहुजन समाजाच्या उद्धारासाठी सुरू केलेली लोकाभिमुख संस्था आहे.
Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil laying the foundation stone for Karmaveer Baburao Ganpatrao Thackeray Engineering College Hostel
Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil laying the foundation stone for Karmaveer Baburao Ganpatrao Thackeray Engineering College Hostelesakal

नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही बहुजन समाजाच्या उद्धारासाठी सुरू केलेली लोकाभिमुख संस्था आहे.

या संस्थेने बहुजन समाजाच्या उत्कर्षाचा वारसा जपला आहे, असे गौरवोद्‌गार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी (ता. ८) काढले. (Radhakrishna Vikhe Patil statement MVP preserved legacy of Bahujan Samaj prosperity nashik)

गंगापूर रोडवरील मविप्र संस्था संचालित कर्मवीर ॲड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय उदोजी महाराज बोर्डिंग कॅम्पस येथे वसतिगृह भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे अध्यक्षस्थानी होते.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, अरविंद कारे, माणिकराव बोरस्ते, माजी मंत्री शोभा बच्छाव यांच्‍यासह संचालक उपस्थित होते.

मंत्री विखे-पाटील म्‍हणाले, की मविप्र संस्थेचा विस्तार मोठा असून, संस्थेला आश्रयदाते, कर्मवीरांची मोठी परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून कार्यकारी मंडळ कार्य करत आहे.

सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेची गरज ओळखून मविप्र व प्रवरा यांसारख्या बहुजन व गरिबांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या, परिश्रमातून उभ्या राहिलेल्या संस्थांनी एकत्रितरीत्या आव्हानांवर काम करण्याची आवश्‍यकता त्‍यांनी व्‍यक्‍त केली. मविप्र संस्थेने बॉशसोबत सुरू केलेल्‍या लॅबचे त्‍यांनी कौतुक केले.

संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी स्‍वागत केले. सभापती क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात संस्थेची वाटचाल व वसतिगृह उभारणीसंदर्भातील भूमिका विशद केली.

प्रा. डॉ. पंकज शेटे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, डॉ. प्रदीप पवार, शैलेश कुटे, अजिंक्य वाघ, स्वाती भामरे, सुरेश पाटील, डॉ. दिनेश बच्छाव, शशिकांत जाधव आदी उपस्थित होते.

Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil laying the foundation stone for Karmaveer Baburao Ganpatrao Thackeray Engineering College Hostel
SAKAL Special: जिल्ह्यात 9 समूह शाळा प्रस्तावित! कमी पटसंख्येच्या 33 ZP शाळांचे होणार एकत्रीकरण

लीज वाढविण्याचे आश्‍वासन

मविप्र संस्थेच्या सिन्नर व आडगाव येथील जमिनीच्या लीजसाठीची मुदत पुढील ३३ वर्षांसाठी वाढवून देत, मागील कर रक्कम माफ करताना पूर्वीच्याच १ रुपये प्रतिवर्ष भाडेकरार आकारण्यात येणार असल्‍याचे आश्‍वासन मंत्री विखे-पाटील यांनी दिले.

संस्था डिजिटल, पेपरलेस व कर्जमुक्तचा मानस

अध्यक्षीय मनोगतात ॲड. ठाकरे म्‍हणाले, की संस्थेला राजाश्रय, लोकाश्रय, कर्मवीर व ध्येयवादी शिक्षकांची मोठी परंपरा लाभली आहे. १९१४ मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते उदोजी बोर्डिंगचे भूमिपूजन झाले.

त्या वेळी महाराजांनी संस्थेला १५ हजार रुपयांची देणगी दिल्याचे स्‍मरण त्‍यांनी केले. आगामी काळात संस्थेचा संकल्प कौशल्यविकास व आधुनिक तंत्रज्ञानावर भर, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी संस्थेने आयआयटी व आयसर यांसारख्या संस्थांसोबत करार केल्याचे सांगितले. भविष्यात संस्था डिजिटल, पेपरलेस व कर्जमुक्त करण्याचा मानस त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil laying the foundation stone for Karmaveer Baburao Ganpatrao Thackeray Engineering College Hostel
SAKAL Exclusive: केंद्रप्रमुखांसह बहुतांश पदभार ‘गुरूजीं’कडेच; शिक्षक भरतीअभावी ताण वाढला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com