गौतम ऋषींच्या अतिप्राचीन मूर्तीची सुरक्षा वाऱ्यावर; आठशे वर्षांचा इतिहास दुर्लक्षित

safety of the ancient idol Gautam rushi is neglected nashik marathi news
safety of the ancient idol Gautam rushi is neglected nashik marathi news
Updated on

म्हसरूळ (जि. नाशिक) : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आणि अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या अतिप्राचीन मूर्तींची सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. रामकुंडातील गोमुखालगत सुमारे आठशे वर्षांची गौतम ऋषींची मूर्ती असून, तीन वर्षांपूर्वी या मूर्तीचे चोरीचे नाट्य घडले होते. तरीही प्रशासन दक्षता घेत नसल्याने भाविक व गोदाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 

रामकुंडातील गोमुखालगत आठशे वर्षांचा इतिहास 

प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहराची अवघ्या जगभरात कुंभनगरी, पुण्यभूमी, तीर्थक्षेत्र म्हणून ओळख आहे. पंचवटीतील गोदाघाट परिसर व तपोवनात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. गोदावरी व अरुणा नदीचा संगम ज्या ठिकाणी होतो, त्याच ठिकाणी जवळपास आठशे ते साडेआठशे वर्षांपासून गोमुखालगत अतिप्राचीन गौतम ऋषींची मूर्ती आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणात बनविलेली असून, तिची उंची सर्वसाधारण एक ते सव्वा फूट आहे. मूर्तीची जागा पुरातन काळातील दगडी संरचनेनुसार बनवत दोन दगड एकमेकांत अडकतील, अशा स्वरूपात बनविली आहे. ही मूर्ती काढून लावता येईल आणि आतील भागात दगडाचा स्पर्श एकमेकाला झाला की मूर्ती काढता येणार नाही, असे विशिष्ट नियोजन कारागिरांनी केलेले आहे. या मूर्तीचा उल्लेख १८८३ च्या बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गॅझेटिअर व डीएसएलआर मॅपमध्येही आढळतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अशा मूर्तींना मोठी मागणी आहे. त्यामुळे हा अनमोल ठेवा जतन करणे, प्रशासनाची जबाबदारी आहे.   

विकासाच्या नावाखाली ऱ्हास 

१८०० पासून १९९२ व २००१ पर्यंत वेळोवेळी विकासाच्या नावाखाली काँक्रिटीकरणाचे थरावर थर चढत गेले आणि आजच्या स्थितीत ही मूर्ती व गोमुख लुप्त झालेले दिसते. रामकुंडातील पाणी आटल्यानंतर ही मूर्ती स्पष्ट दिसते. आतातरी प्रशासनाने स्मार्टसिटींतर्गत गोदाघाट परिसरात सुरू असलेली कामे करताना अशी आशा नाशिककरांसह गोदाप्रेमी व्यक्त करीत आहेत. 

मूर्तीचोरीचे नाट्य 

डिसेंबर २०१७ मध्ये रामकुंड स्वच्छ करण्यासाठी पाणी कमी करण्यात आले होते. गौतम ऋषींच्या मूर्तीची चोरी झाली होती. परंतु या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी, नरेंद्र धारणे, किशोर गरड, अतुल शेवाळे आदींनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताच त्याच दिवशी दुपारी चारपर्यंत मूर्ती मूळ जागी परत आली होती. 

इतिहास जतन करणे गरजेचे 

गोदाघाट परिसरात अनेक देवदेवतांच्या प्राचीन मूर्ती आहेत. त्यांचा इतिहास जतन करणे ही काळाची गरज असून, येणाऱ्या भाविकांना त्याचे यथायोग्य दर्शन मिळायला हवे. या प्राचीन मूर्तींची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असून, त्याच दृष्टिकोनातून प्रशासनाने सुरक्षेचे नियोजनही करायला हवे. ऐतिहासिक व पुरातन ठेवा कसा अधिक जपता येईल, येणाऱ्या भाविकास व पर्यटक पुरातन संस्कृतीचे दर्शन कसे घडेल यासाठी प्रयत्नशील राहावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com