Nashik : व्यसनमुक्तीची शपथ घेऊन साईभक्त शिर्डीकडे रवाना! साई भजनांनी मुंबई महामार्गावर चैतन्याचे वातावरण

‘व्यसनमुक्त’ पदयात्रेची शपथ घेऊन जाणारी पालखी अनेकांना भुरळ घालणारी ठरत आहे.
A palanquin of Om Sai Mandal from Dombivli headed towards Shirdi with the slogan 'With God, meeting with God'.
A palanquin of Om Sai Mandal from Dombivli headed towards Shirdi with the slogan 'With God, meeting with God'. esakal

इगतपुरी : शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी जानेवारीमध्ये अनेक पालख्या मुंबईहून शिर्डीकडे प्रस्थान करतात. यंदाही ठाणे, मुंबई, कसारा, शहापूर, डोंबिवली आदी भागांतून पालख्या व पदयात्री शिर्डीकडे रवाना झाले आहेत.

यात प्रमुख आकर्षण ठरतेय ती ओम साई मंडळ, राजाजी पथ डोंबिवली ते शिर्डी पालखी.‘देवा सोबत, देवाच्या भेटीला’ या ब्रीद घेऊन शेकडो भाविक पदयात्रा करीत आहेत. (Sai devotee leaves for Shirdi after vowing to get rid of addiction Sai Bhajans enlivened Mumbai Highway Nashik)

‘व्यसनमुक्त’ पदयात्रेची शपथ घेऊन जाणारी पालखी अनेकांना भुरळ घालणारी ठरत आहे. व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम जगातील करोडो नागरिक भोगत आहेत. त्यामुळे पालखी मार्गात व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचे काम पालखीचे स्वयंसेवक व सेवेकरी करीत आहेत.

पालखी सलग २० वर्षांपासून सुरू आहे. पालखीसह पदयात्री मजल-दरमजल करत राजाजी पथ, डोंबिवली ते शिर्डीत दाखल होतात. पहाटे पदयात्रेस सुरवात करून रोज ४० ते ५० किलोमीटर अंतर चालतात.

A palanquin of Om Sai Mandal from Dombivli headed towards Shirdi with the slogan 'With God, meeting with God'.
Nashik MSBCC Survey: पहिल्याच दिवशी सर्व्हेक्षणाला पोर्टलचा खो! मराठा कुटुंबातील 181 प्रकारची माहिती भरावी लागणार

पालखी खांद्यावर घेऊन ‘साईबाबा की जय’, ‘ओम साईराम, जय साईराम’चा जयघोष करत, भजने म्हणत पदयात्रा रवाना होतेते. भजन व साईबाबांच्या जयघोषाने रस्त्यावर चैतन्याचे वातावरण तयार होत असते. वाहनधारक व स्थानिक नागरिक पालखीचे दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही.

"‘देवासोबत, देवाच्या भेटीला’ हे ब्रीद घेऊन आमची पदयात्रा अखंडपणे सुरू आहे. व्यसनमुक्त पदयात्रा हे आमचा मुख्य ध्येय असून, व्यसनापासून जास्तीत जास्त परावृत्त करण्याचे काम सेवेकरी करीत असतात. पदयात्रींच्या आरोग्याची संपूर्ण व्यवस्था मंडळाकडून करण्यात येते."

-स्वप्नील कांबळे, पदयात्री, डोंबिवली

A palanquin of Om Sai Mandal from Dombivli headed towards Shirdi with the slogan 'With God, meeting with God'.
Nashik News: सायखेड्यात हळदी कुंकवाला तृतीयपंथीयांना मान! गोदाकाठ पत्रकार संघ, सायखेडा पोलिसांचा संयुक्त उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com