SAKAL Impact: अंबासन ते काकडगाव दरम्यान रस्त्यावरील काम अखेरीस सुरू; वाहनचालकांसह नागरिकांकडून समाधान

SAKAL Impact Road work finally begins between Ambasan and Kakadgaon Satisfaction from citizens including motorists
SAKAL Impact Road work finally begins between Ambasan and Kakadgaon Satisfaction from citizens including motoristsesakal

अंबासन, (जि.नाशिक) : येथील अंबासन फाटा ते काकडगावपर्यंत रस्त्यावर खड्ड्यातून खडतर प्रवास वाहनचालकांना प्रवास करावा लागत होता.

याबाबत रविवार (ता.६) रोजी 'अंबासन, काकडगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित विभागाकडून दखल घेऊन युध्दपातळीवर सदर रस्त्यावर काम सुरू केले आहे. वाहनचालकांसह नागरिकांकडून आभार व्यक्त होत आहेत. (SAKAL Impact Road work finally begins between Ambasan and Kakadgaon Satisfaction from citizens including motorists Nashik)

गेल्या अनेक वर्षांपासून मालेगाव हद्दीतील अंबासन फाटा ते काकडगावपर्यंत रस्त्यावर जीवघेणी खड्ड्यातून वाहनचालकांसह शेतीशिवारातील शेतकऱ्यांना मार्गस्थ व्हावे लागत होते. खड्ड्यातून खडतर प्रवास करीत असताना अनेक छोटे- मोठे अपघात घडत होते.

अनेक दुचाकीस्वार खड्डे वाचविण्याच्या नादात डोक्यात तसेच हातापायावर जखमी झाले आहेत. ग्रामस्थांकडून अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नव्हती अखेरीस संतप्त झालेल्या युवकांनी रविवार (ता५) अंबासन फाट्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करीत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवून संताप व्यक्त केला होता.

याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित विभाग खडबडून जागे होत मालेगाव हद्दीपासून काकडगावपर्यंत रस्त्यावरील काम सुरू केले आहे. या रस्त्यावरील कामाला गती मिळावी म्हणून ठिकठिकाणी खडी टाकण्यात आली आहे.

दरम्यान भारतीय स्टेट बँक समोरील तसेच काकडगावाजळील भारत गॅस गोडाऊनसमोर व शिवबाण फाट्यावरील रस्त्यावरील उचकटून पडलेल्या खडीची मुरूम टाकून तात्परत स्वरूपात डागडुजी करून रस्त्या रहदारीस मोकळा केला आहे.

SAKAL Impact Road work finally begins between Ambasan and Kakadgaon Satisfaction from citizens including motorists
Sakal Impact : जिल्ह्यातील रखडलेले प्रस्ताव मार्गी लागणार; ‘सकाळ’ने फोडली होती वाचा

रस्त्यावरील काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांकडून 'सकाळ'चे आभार व्यक्त केले जात आहेत.

"गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर खड्ड्यातून मार्गस्थ व्हावे लागत असतानाच खड्ड्यांमुळे अपघातही घडत होते. वेळोवेळी संबधित विभागाच्या आधिकाऱ्यांना दुरूस्तीबाबत तक्रारी केल्या आहेत. सकाळने वृत्त प्रसिद्ध करताच रस्त्यावर काम सुरू झाले 'सकाळ'चे आभार."

- चंद्रकांत कोर, तालुका संघटक, शिवसेना (ठाकरे गट)

"रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांतून दुचाकीवरून प्रवास करताना मोठे हात होत होते. तसेच रस्त्यावरील उचकटून पडलेली खडी धोकादायक ठरत होती. संबंधित विभागाकडून दखल घेऊन काम सुरू केल्याने रस्ता सुकर होणार आहे."

- विठ्ठल महाजन, माजी ग्रामपंचायत सदस्य, अंबासन.

SAKAL Impact Road work finally begins between Ambasan and Kakadgaon Satisfaction from citizens including motorists
SAKAL Impact: मांगीतुंगीसह पिंपळकोठे अन दसवेल फाट्यावर एसटी बसगाड्यांना थांबा; उत्पन्न वाढीला मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com