SAKAL Special : महासिर मासा राज्य मासा करण्यासाठी नाशिक मत्स्य विभागाचे Social Engineering | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo of Mahasir Fish and photo of Pranita Chande Assistant Commissioner.

SAKAL Special : महासिर मासा राज्य मासा करण्यासाठी नाशिक मत्स्य विभागाचे Social Engineering

नाशिक रोड : महासिर मासा हा राज्य मासा करण्यासाठी नाशिक विभागात सध्या सामाजिक जबाबदारी म्हणून जनजागृती केली जात आहे. लुप्त होत चाललेला हा मासा स्थानिक नद्या जलाशय धरणे यामध्ये आढळल्यास मत्स्य व्यवसाय विभागाला संपर्क साधण्याचे आवाहन मच्छीमार संस्था व मच्छीमारांना करण्यात आले आहे.

या माशाची प्रजाती मानवी आहाराला गुणात्मक आणि दर्जात्मक असून या माशाचे स्थानिक नाव वाढीस खडप्या आणि खवल्या असे घेतले जाते. म्हणून हा मासा राज्य मासा करण्यासाठी नाशिक मत्स्य व्यवसाय कार्यालय सध्या मासेमारी करणाऱ्यांना आवाहन करून सोशल इंजिनिअरिंग प्रयोग राबवत आहे. (SAKAL Special Social Engineering of Nashik Fisheries Department to make Mahasir fish state fish nashik news)

महाराष्ट्रातून लुप्त होत चाललेला महासिर माशाची जतन सध्या लोणावळ्यात केले जात आहे. टाटा कंपनीची हॅचरी लोणावळ्यात महासिर मासा जतन करीत आहे. हा मासा नाशिकच्या कश्यपी गंगापूर ओझरखेड चनकापूर नानाशी धरणांबरोबरच स्थानिक नद्या जलाशयांमध्ये आढळतो.

नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी सुरगाणा इगतपुरी त्रंबकेश्वर दिंडोरी पेठ कळवण येथील जलाशयांमध्ये आढळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. खाण्यासाठी चवदार प्रोटीन आणि कॅल्शियम युक्त हा मासा जतन करण्याचे काम नाशिक विभागात केले जाणार आहे.

यासाठी नाशिक मत्स्य व्यवसाय विभागाने या माशाचे प्रजनन अंडी मिळाल्यास त्या वाढवण्याची जबाबदारी घेतली आहे. हे मासे 10 सेमी ते बारा सेमी पर्यंत वाढवून विविध नाशिक जिल्ह्यातील जलाशयात सोडले जाणार आहे. नद्या आणि ओढ्यांचे पर्यावरणीय संतुलन राखण्यात हा मासा महत्त्वाची भूमिका बजावण्याबरोबरच पाण्याची शुद्धता अबाधित ठेवण्यात हा मासा कार्य करतो.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

म्हणून हा मासा आढळल्यास मच्छीमार व्यक्तींना व संस्थांना मत्स्य व्यवसाय विभागाकडे आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मत्स्य व्यवसाय विभाग या माशांच्या संख्येत वाढ करून त्याचा लाभ मच्छीमारांना करून देणार असल्याचे उपायुक्त संजय वाटेगावकर यांनी सांगितले.

"एक लुप्त होत चाललेली प्रजाती असून हा गोड्या पाण्यातील मासा पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मदत करण्याबरोबरच खाण्यासाठी चविष्ट आहे. हा मासा राज्य मासा करण्यासाठी आम्ही या माशाच्या प्रजाती मत्स्य व्यवसाय विभागाला आणून द्या आम्ही या माशाची लोकसंख्या वाढवून जतन करण्याचे काम करू असे आवाहन केले आहे. यासाठी आम्ही मच्छीमारांमध्ये जनजागृती बरोबरच ठिकाणी हे मासे आढळल्या वर जतन करण्याची नियोजन करीत आहोत."

- प्रणिता चांदे, सहाय्यक मत्स्य आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग नाशिक.

टॅग्स :NashikSakalfish