International Women's Day: महिला दिन स्‍नेहमेळाव्यात तनिष्‍कांचा सन्मान

Tanishka honored with letter of honor
Tanishka honored with letter of honoresakal

नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी (ता. ८) ‘सकाळ तनिष्‍का’ व्‍यासपीठातर्फे सातपूर कार्यालयात महिला सदस्‍यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर अध्यक्षस्थानी होते.

पुरोहिता स्‍मिता आापटे व वनपाल वर्षा सोनवणे प्रमुख पाहुण्या होत्या. (sakal Tanishka honor for womens at get together on International Womens Day nashik news)

सर्व उपस्थित तनिष्का सदस्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना संपादक डॉ. रनाळकर म्हणाले की, महिला शक्‍ती एकवटल्‍यास काहीही अशक्‍य नाही. केवळ नियोजन व अंमलबजावणीचा ध्यास घेऊन तनिष्‍कांचे बळ सर्वत्र वाढविता येईल.

‘तनिष्का’ व्यासपिठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांसह सर्वसामान्य महिलांकडूनही प्रेरणादायी कार्य घडत राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. आव्हानात्‍मक प्रसंगातून सावरत कुटुंबाची घडी बसविणाऱ्या रसवंती गृहाच्या संस्‍थापिका सुनीताताई निमसे यांनी मनोगत व्यक्त करताना खडतर प्रवासात सकारात्‍मक दृष्‍टीकोणाने झालेला बदल कथन केला.

तनिष्का सदस्‍या डॉ. चंचल साबळे, वंदना रकीबे यांनीही मनोगत व्यक्‍त केले. वनपाल श्रीमती सोनवणे म्हणाल्या, की शारिरीक सुदृढतेबरोबरच मनाची सदृढता कायम राखली पाहिजे. मनोबलासाठी व्यायाम, प्राणायाम यांचे आचरण करावे.

‘नवी उमेद घेऊन, पंखात उर्जा भरून...’ या काव्य पंक्‍तींद्वारे त्यांनी या वेळी महिलांना प्रोत्‍साहीत केले. सहनशीलता या गुणानुषंगाने महिला बाहेरची जबाबदारी पार पाडतानाच कुटुंबाप्रतीही योगदान देत असतात. आपल्‍यातल् या‍या महिला प्रतीमेला त्‍यांनी मानाचा मुजरा केला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Tanishka honored with letter of honor
Chandanpuri Khanderao Mandir : चंदनपुरीच्या खंडेराव मंदिर संवर्धनास प्रारंभ

पुरोहिता श्रीमती आपटे यांनी दातृत्‍वाच्या आदर्श असणाऱ्या राजमाता अहिल्‍याबाई होळकरांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘अहिल्‍यामुळे इतिहासाचे पान चमकते खरोखर’ हा स्वरचित पोवाडा या वेळी सादर केला. उपस्‍थित सर्व तनिष्‍कांना या वेळी सन्मान चिन्ह व उत्‍तर महाराष्‍ट्र प्रवास मार्गदर्शन पुस्तिका देऊन गौरविण्यात आले.

फेर धरत केला आनंद साजरा

या वेळी तनिष्का सदस्‍यांनी फेर धरत आनंद साजरा केला. पारंपारिक वेशभुषेत कार्यक्रमात सहभागी झालेल्या तनिष्‍कांनी गाण्यांच्या तालावर फेर धरत विविध खेळांचा आनंद घेतला. आढाचं पाणी काढोणी, ऐलमा पैलमा, काळी चंद्रकळा नेसू कशी अशा भोंडला व विविध गितांवर नृत्‍य सादर केले. तनिष्‍का समन्वयक विजयकुमार इंगळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

तनिष्का म्हणाल्या...

"आजच्या कार्यक्रमातून एक नवी उमेद व आनंद मिळाला. सर्व महिला एकत्रीत गाण्यावर फेर धरत नाचतांना खून छान वाटले."-अर्चना कोप

"‘सकाळ तनिष्का’ व्यासपीठ हे सामान्य महिलेपासून विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांसाठी खुले असे व्यासपीठ आहे. यातून समाजकार्य करताना वेगळाच आनंद मिळतो. आजचा कार्यक्रम छान झाला." -नयना आव्हाड

Tanishka honored with letter of honor
International Women's Day: मनमाडला पोलिस ठाण्यात महिला राज! महिला दिनानिमित्त सांभाळली पूर्ण जबाबदारी

"कार्यक्रमातील पारंपारीक खेळातून आनंद मिळाला. तसेच आमच्या सन्मानाने आम्‍ही भरावून गेलो. अजून नवे काही करण्याचे बळ आजच्या कार्यक्रमातून मिळाले."

-हिना बंगाळे

"तनिष्‍का व्यासपीठाचे मनापासून धन्यवाद. आम्‍हा महिलांना यातून मिळालेले बळ व प्रेरणा अप्रतीम आहे." -संगीता जाधव

"तनिष्‍का म्‍हणून काम करण्याचा आनंद वेगळाच आहे. महिलादिनीच आमचा सत्‍कार होतो असे नाही, तर ‘सकाळ तनिष्का’ व्यासपीठातून नेहमी आम्‍हाला कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा मिळते."

-नयना पाटील.

Tanishka honored with letter of honor
Nashik News : निरीक्षण- बालगृहातील बालकांनी लुटला सर्कशीचा आनंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com