Nashik News: सखी सावित्री समित्या अखेर गठीत; राज्यात पावणेदोन वर्षांनी कार्यवाही

Sakhi Savitri Committee is formed nashik news
Sakhi Savitri Committee is formed nashik news

Nashik News : स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व अनुदानित, खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये सखी सावित्री समित्या गठीत करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्ह्यात समित्या गठीत करण्याचे करण्याचे काम जोमाने सुरू आहे. (Sakhi Savitri Committee is formed nashik news)

मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप, समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठण करावे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने १० मार्च २०२२ मध्ये दिले होते. सखी सावित्री समित्यांच्या गठणाबाबत ‘शाळांना पडला सखी सावित्री समित्यांचा विसर’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते.

बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यात समितीची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये समिती स्थापन झालेली नसल्याचे शिक्षणप्रेमींच्या सर्वेक्षणात उघड झाले होते. पावणेदोन वर्षांपासून समित्या स्थापण्याबाबत अंमलबजावणी न झाल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने समित्या गठीत करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

असा आहे आदेश

शाळास्तर सखी सावित्री समिती, केंद्रस्तरावर केंद्रस्तर सखी सावित्री समिती, तसेच गटस्तरावर तालुका/शहर साधन केंद्रस्तर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात यावे. तालुकास्तर समितीच्या कार्याचा अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सादर करावा, जेणेकरून जिल्ह्यातील कोणत्याही स्तरावर मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्यांबाबत निर्माण झालेल्या अडचणी समजू शकतील व त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Sakhi Savitri Committee is formed nashik news
Nashik News: बालसंगोपनाचे अनुदान लटकले! जिल्ह्यातील 3 हजार 778 बालके 7 महिन्यांपासून वंचित

शंभर टक्के पटनोंदणी, उपस्थितीसह विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक व बौद्धिक विकासासाठी शिक्षण विभागाने समिती नेमली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा, शाळेमधील पोषक वातावरण, विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांचे समुपदेशन, सखी सावित्री समित्यांचा मुख्य उद्देश आहे. पोक्सोंतर्गत असलेल्या ‘ई-बॉक्स’ची माहिती तसेच चिराग ॲपची माहिती व चाइल्ड हेल्पलाइन नंबर (१०९८) बाबत शाळेत सूचनाफलक लावणे बंधनकारक आहे.

अशी असणार समिती

सखी सावित्री समितीचे अध्यक्षपद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडे असेल. उर्वरित समितीत शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी, समुपदेशक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ (महिला प्रतिनिधी), अंगणवाडीसेविका, पोलिसपाटील, ग्रामपंचायत सदस्य (महिला प्रतिनिधी), पालक (महिला प्रतिनिधी), शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी (दोन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी) शाळेचे मुख्याध्यापक (सचिव) अशा दहा जणांचा समितीत समावेश आहे.

Sakhi Savitri Committee is formed nashik news
Nashik News: सरकारी काम अन सहा महिने थांब..! रिक्त जागांमुळे सरकारी कामकाज अधू, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com