electric vehicle fire on Samruddhi Mahamarg
esakal
सिन्नर : समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील दुसंगवाडी शिवारात धावत्या इलेक्ट्रिक कारला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी (ता. २७) दुपारी घडली. या आगीत टाटा नेक्सॉन ईव्ही (एमएच १५ एचवाय ५५६३) ही कार पूर्णपणे जळून खाक (Tata Nexon EV fire on Samruddhi Expressway) झाली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच कारमधून बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.