नाशिक: समृद्धी महामार्गाचा विस्तार करत भरवीर ते वाढवण या नव्या द्रुतगती महामार्गास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच या मार्गाच्या प्रकल्प आराखड्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ होणार असून, भूसंपादन व निविदा प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.