esakal | संजय राऊत आज नाशिकमध्ये; भाजपच्या बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा शक्य 
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut bjp.jpg

शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कनेते खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. ते भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांच्या प्रवेशाबद्दल चर्चा करणार असल्याने राजकीय दृष्टीने राऊत यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

संजय राऊत आज नाशिकमध्ये; भाजपच्या बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा शक्य 

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कनेते खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व सुनील बागूल यांच्या प्रवेशाबद्दल चर्चा करणार असल्याने राजकीय दृष्टीने राऊत यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे

गिते, बागूल यांच्या प्रवेशाबद्दल चर्चा शक्य 

दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी गिते व बागूल दोघेही कुठे प्रवेश करणार नसून ते भाजपमध्येच राहणार असल्याचे सांगताना त्यांची पक्षाला गरज असल्याचे बुधवारी (ता.६) सांगितले. वसंत गिते व सुनील बागूल पूर्वाश्रमीचे शिवसैनिक सध्या भाजपमध्ये प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहे. गिते व बागूल दोघेही पक्षात नाराज असल्याने त्यांच्या पक्षांतराची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

राजकीय घडामोडी होण्याची शक्यता

गिते यांनी मिसळ पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना एकत्र करून राजकीय पक्षांतराचे संकेत दिले होते. त्यापार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिकमध्ये येत आहेत. गिते व बागूल यांचा प्रवेश सोहळा लगेचच होणार नसला तरी प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस राऊत यांचा नाशिकमध्ये मुक्काम असेल. दोन दिवसांत शहरात राजकीय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राऊत यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  

वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड 

loading image